भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा पहिला कसोटी सामना नुकताच नागपूर येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव व 132 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातून भारतीय संघासाठी सूर्यकुमार यादव व केएस भरत यांनी कसोटी पदार्पण केले. मात्र, दोघेही प्रत्येकी आठ धावा करून माघारी परतले. मात्र, असे तीन फलंदाज राहिले आहेत ज्यांनी भारतासाठी कसोटी पदार्पण करताना सर्वाधिक धावा ठोकलेल्या. आज आपण त्याच फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.
शिखर धवन
भारताकडून (ind vs aus) पदार्पणाच्या कसोटीत (Debut Test) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नावावर आहे. शिखरने 14 मार्च 2013 रोजी मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना शिखरने 187 धावांची जबरदस्त खेळी केली. भारताने हा सामना 6 विकेटने जिंकला.
शिखरने आतापर्यंत एकूण 34 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने 2315 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा
या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात जबरदस्त शतक झळकावले.
त्या सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्माने 177 धावांची शानदार खेळी केली. रोहितने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 39 कसोटी सामने खेळले असून, 66 डावांत त्याने 2679 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 आहे.
लाला अमरनाथ
माजी दिग्गज भारतीय खेळाडू लाला अमरनाथ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याने 15 डिसेंबर 1933 रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्या सामन्यात लाला अमरनाथ यांनी दोन्ही डावात एकूण 156 धावा केल्या होत्या. त्याने उत्कृष्ट शतक झळकावताना पहिल्या डावात 38 आणि दुसऱ्या डावात 118 धावा केल्या. लाला अमरनाथ यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 24 सामने खेळले, त्यांनी 878 धावा केल्या. (ind vs aus 3 Indian batsmen who scored most runs in debut Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूर कसोटीत धक्कादायक प्रकार, मैदानात बसून सुरू होती सट्टेबाजी
IND vs AUS : कसोटी सामन्यात विराटकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला…