भारत वि.ऑस्ट्रेलिय संघ यांच्यात नागपूरमध्ये बॉर्डर-गावसकर चषकातील पहिला सामना खेळला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लाईव्ह कसोटी सामना सुरू असताना थेट मैदानातून सट्टेबाजी करणाऱ्या चौघांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या माहितीनुसार हे चौघेही मैदानात बसून ऑनलाईन सट्टा लावत होते. पोलिसांनी या चौघांवर बारीक लक्ष ठेवल्यानंतर आणि त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.
मैदानावर लाईव्ह सुरू असलेला क्रिकेटचा सामना आणि लाइव ब्रॉडकॉस्टिंग यामध्ये 15 ते 17 सेकंदाचा फरक पडतो. याचाच फायदा घेऊन काही जण मैदानातून सट्टेबाजी करत असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांकडून स्टेडियममध्ये लक्ष ठेवले गेले आणि या चौघांना ताब्यात घेतले गेले. या चौघांपैकी एक जण मुंबई, एक भंडारा तर दोघे जण हे नागपूरचे रहवासी असल्याची माहिली मिळाली आहे. या रॅकेटचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास पुढेही सुरूच आहे.
क्रिकेट सामन्यावर कोट्यवधींची सट्टेबाजी होत असते. याच पार्श्वभूमीवर नागपूर कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त एम. सुदर्शन आणि पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांचे पथक मैदानात उपस्थित होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांना या ४ जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. या चौघांना पोलिसांनी शुक्रवारी (10 फेब्रुवारी) दुपारच्या वेळी ताब्यात घेतले गेले. या चौघांचेही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. चौघांनीही क्रिकेट सामन्यादरम्यान सट्टेबाजांना मदत करीत असल्याची कबुली दिली. या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर भारताने 132 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन संघाने भारतापुढे अक्षरशः गुडघे टेकले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचे 177 धावांवर सर्व गडी बाद झाले. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 400 धावा साकरल्या आणि ऑस्ट्रेलियावर 223 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर चाहत्यांना त्यांच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघाची परिस्थिती पहिल्या डावापेक्षा विकट झाली. अवघ्या 91 धावांवर सर्वच्या सर्व ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद झाले आणि भारताने सामना जिंकला. उभय संघांतील या बॉर्डर गावसकर चषकात भारत आता 1-0 अशा आघाडीवर आहे. (ind-vs-aus-test-series-live-from-the-ground-in-nagpur-vca-stadium-arrest-4-cricket-betting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण अश्विनचा कुठं! 300 असो किंवा 450, भारताकडून त्यानेच घेतल्यात सर्वात जलद विकेट्स
कपिल देवपेक्षा जडेजा-अश्विनचे प्रदर्शन वरचढ! नागपूर कसोटीत रचला गेला नवा विक्रम