शनिवारी (दि. 29 एप्रिल) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आयपीएलच्या 16व्या हंगामातील 39वा सामना खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. हा सामना हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने 7 विकेट्सने जिंकला. असे असले, तरीही या सामन्यातील एक गोष्ट सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. कोणती आहे ती गोष्ट चला जाणून घेऊयात…
या सामन्यात नाणेफेकीवेळी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) याने युवा खेळाडूला संधी दिली. विशेष म्हणजे, राणाने प्लेइंग इलेव्हनमधून उमेश यादव (Umesh Yadav) या अनुभवी गोलंदाजाला काढून हर्षित राणा (Harshit Rana) या युवा खेळाडूला संधी दिली. कोलकाताच्या गोलंदाज विभागात सातत्याने बदल केले जात आहेत. त्याचे कारण असे की, केकेआरचा वेगवान गोलंदाजी विभाग कमजोर पडताना दिसत आहे. उमेश यादव याला फलंदाज म्हणून सातत्याने खेळवले जात असले, तरी तो अद्यापही संघासाठी विशेष खेळी करू शकला नाहीये.
तसं पाहिलं, तर कोलकाता संघाच्या गोलंदाजांची संगीत खुर्ची चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी याला, तर कधी त्याला खेळवले जात आहे. गुजरात विरुद्धच्या या सामन्यात उमेशच्या संघातील स्थानात बदल करून हर्षित राणा या गोलंदाजाला उतरवले. झाले असे की, रसीख सलाम हा खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाने हर्षितला 20 लाख देऊन ताफ्यात सामील करून घेतले होते. मात्र, मागच्या कोणत्याच सामन्यात त्याला मैदानात उतरता आले नव्हते. उमेश यादवची कामगिरी खराब राहिल्यामुळे हर्षित राणाला गुजरातविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली.
हर्षित राणाची आयपीएल कामगिरी पाहिली, तर त्याला मागच्या हंगामात फक्क 2 सामन्यात संधी मिळाली होती, त्यातही त्याला फक्त एक विकेट घेता आली होती. परंतु एका वर्षानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. या सामन्यात त्याने गुजरातविरुद्ध 3 षटके गोलंदाजी करताना 35 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. त्याने कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला पायचीत करत महत्त्वाची विकेट नावावर केली.
Partnership broken!
The fifty-run stand is put to an end as #GT captain Hardik Pandya departs.
Harshit Rana with the breakthrough ????????????????
Follow the match ▶️ https://t.co/SZJorCvgb8 #TATAIPL | #KKRvGT pic.twitter.com/PXHa94Bvox
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
कोण आहे हर्षित राणा?
हर्षित राणा हा मुळचा दिल्लीचा आहे. त्याने दिल्लीसाठी वरिष्ठ स्तरावर धमाकेदार कामगिरी केली होती. शिवाय रणजी ट्राॅफीसाठी देखील दमदार कामगिरी केली होती. त्याने 5 प्रथम श्रेणी सामन्यात गोलंदाजी करताना 3.79च्या इकॉनॉमी रेटने 21 विकेट्स घेतल्या होत्या. त्याव्यतिरिक्त फलंदाजी करताना त्याने 152 धावाही केल्या होत्या. याव्यतिरिक्त त्याच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये 1 विकेटही आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: लाईव्ह सामन्यात गिल-राणामधील बाचाबाची चव्हाट्यावर, DRS ड्राम्यानंतरचा क्षण व्हिडिओत कैद
गुरबाजची 81 धावांची वादळी खेळी व्यर्थ, शंकर-मिलरच्या जोरावर KKRचा धुव्वा उडवत गुजरात संघ बनला ‘टॉपर’






