---Advertisement---

‘तू…डोक्यावर घेऊ नको’, द्विशतकानंतर ईशानने फोन करताच ‘अशी’ होती वडिलांची प्रतिक्रिया

On: शुक्रवार, डिसेंबर 16, 2022 5:23 PM
Ishan-Kishan
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा फलंदाज ईशान किशन याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत संधी मिळताच त्याचं सोनं केलं. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांना घाम फोडत द्विशतक झळकावले. त्याने त्याचे शतकच द्विशतकात बदलून टाकले. या खेळीनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. ईशानच्या या द्विशतकानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या भविष्याबद्दल एक मोलाचा सल्ला दिला.

ईशान किशन (Ishan Kishan) याने बांगलादेशविरुद्ध 131 चेंडूत 210 धावांचा पाऊस पाडला होता. तो जलद द्विशतक ठोकणारा फलंदाजही बनला. त्याच्या या शानदार खेळीनंतर त्याच्या वडिलांनी दिलेला सल्ला सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे.

ईशानच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “जेव्हा तो शतक मारतो, तेव्हा मी जास्त काही बोलत नाही. त्याला जगभरातून शाबासकी मिळत असते. सामन्यानंतर ईशान किशनने मला फोन केला होता. मी त्याला म्हणालो होतो की, या द्विशतकाला डोक्यावर चढू देऊ नको.”

टी20 विश्वचषक 2022मध्ये ईशान संघाबाहेर
खरं तर, ईशान किशन या वर्षा म्हणजेच टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. ईशानचे वडील म्हणाले की, “निवड न झाल्यामुळे तो खूपच निराशेत आणि तणावात होता. जेव्हा त्याची निवड झाली नाही, तेव्हा तो खूपच उदास झाला होता. घरात त्याला झोप येत नव्हती आणि छतावर तो एकटाच फिरायचा. त्यावेळी मी त्याला बोलावले आणि म्हटले की, त्याने स्वत:साठी खेद वाटून घेतला नाही पाहिजे. आतापासून तू अशी कामगिरी कर की, तुला संघाबाहेर काढण्याची कुणालाही संधी मिळाली नाही पाहिजे. पुढील वर्षी वनडे विश्वचषक आहे. त्यासाठी तयार कर आणि संधीचा फायदा घे.”

ईशान किशन बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर भारतात परतला आहे. किशन हा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नाहीये. तो भारतात आल्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये झारखंड संघासाठी खेळत आहे. त्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये केरळ संघाविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. (cricketer ishan kishan father special advice to ishan after hit double century against bangladesh)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 1 हजारहून अधिक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ‘या’ खेळाडूंच्या बॅटमधून निघाले शतक, यादीत दोन भारतीय
भारताच्या वाघाची गर्जना! शुबमनने बांगलादेशविरुद्ध झळकावलं पहिलं वहिलं शतक, षटकार- चौकारांचा पाडला पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---