रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ चेन्नई येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करत आहे. या मालिकेत स्टीव्ह स्मिथ याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघ 1-1 अशा बरोबरीत आहे. अशात दोन्ही संघ तिसरा वनडे सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. या सामन्यात स्मिथने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यादरम्यान चालू सामन्यात केएल राहुल याने यष्टीरक्षण सोडत मैदानाच्या बाहेर धाव घेतली. त्यामुळे चाहतेही गोंधळात पडले.
मैदानावर बाहेर गेला राहुल
पहिल्या वनडे सामन्याचा हिरो असलेला केएल राहुल (KL Rahul) हा पुन्हा एकदा चर्चेत आला. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना 16व्या षटकानंतर राहुल मैदानाबाहेर गेला. अशात त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील असलेला ईशान किशन (Ishan Kishan) यष्टीरक्षणासाठी मैदानात आला. विशेष म्हणजे, मालिकेच्या पहिल्या सामन्यात केएल राहुल आणि ईशान किशन (KL Rahul And Ishan Kishan) दोघेही प्लेइंग इलेव्हनचा भाग होते. मात्र, राहुलनेच यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडली होती.
K L Rahul isn't on the field currently. Substitute keeper Ishan Kishan is keeping the wickets. pic.twitter.com/RstH9B7dm8
— Juman Sarma (@cool_rahulfan) March 22, 2023
ईशान का करतोय यष्टीरक्षण?
केएल राहुल मैदानाबाहेर का गेला, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती आली नाहीये. मात्र, किशन नियमित यष्टीरक्षक आहे. त्यामुळे राहुल मैदानाबाहेर गेल्यानंतरही भारतीय संघाचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसं पाहिलं, तर चेन्नईमध्ये खूपच कडक ऊन आहे. अशात राहुल मैदानाबाहेर जाण्याचे हेदेखील कारण असू शकते. मात्र, 29व्या षटकात राहुल पुन्हा मैदानावर परतला.
The Wicket Keeper #KLRahul on duty …..#INDvAUS pic.twitter.com/3lUpbsnSif
— KL Siku Kumar (@KL_Siku_Kumar) March 22, 2023
नियम काय सांगतो?
क्रिकेटमध्ये सब्स्टिट्यूट खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही. तसेच, तो नेतृत्वही करू शकत नाही. एमसीसीच्या 24.1.2 या नियमानुसार सब्स्टिट्यूट खेळाडू यष्टीरक्षण करू शकतो. मात्र, यासाठी मैदानातील पंचांची परवानगी घ्यावी लागते. कन्कशन सब्स्टिट्यूटच्या स्थितीतच प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर असलेल्या खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येऊ शकते. 16व्या षटकानंतर ऑस्ट्रेलिया संघाने 3 विकेट्स गमावत 92 धावा केल्या होत्या. (cricketer ishan kishan replaced kl rahul in the wicket keeping ind vs aus chennai odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठ महिने आधीच कोच द्रविड यांनी उघड केला टीम इंडियाचा ‘वर्ल्डकप प्लॅन’! म्हणाले, “17-18 खेळाडू…”
तब्बल 6 वर्षांनंतर वनडेत स्मिथच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, पंड्याने उचलला सिंहाचा वाटा