---Advertisement---

दोन खेळाडूंनी चपळाई दाखवत पकडला अविश्वसनीय झेल, पाहून तुम्हीही तोंडात घालाल बोटे, व्हिडिओ व्हायरल

On: रविवार, मार्च 26, 2023 6:34 PM
CIYMS-vs-Dreux
---Advertisement---

प्रत्येक क्रिकेट सामन्यात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे काही क्षण पाहायला मिळतात. यावेळी खेळाडूंनी दाखवलेल्या चपळाईमुळे त्यांची जगभरात वाहवा झाल्याशिवाय राहत नाही. असेच काहीसे आता युरोपियन क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळाले. यूरोपीय क्लब क्रिकेटच्या क्वालिफायर सामन्यात एक असा झेल पाहायला मिळाला, ज्यावर विश्वास करणे खूपच कठीण आहे. या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सीआयवायएमएस विरुद्ध ड्रेक्स (CIYMS vs Dreux) संघातील सामन्यादरम्यान हा झेल पाहायला मिळाला. सीआयवायएमएसच्या जेसन व्हॅन डर मर्व्हे (Jason van der Merwe) आणि जेकब मुल्डर (Jacob Mulder) यांनी ड्रेक्स संघाविरुद्ध शानदार झेल पकडला. या दोघांनीही सीमारेषेच्या जवळ कमालीची चपळाई आणि फिटनेसच्या जोरावर फलंदाजाला तंबूत धाडले.

सीआयवायएमएस संघाचा गोलंदाज ऍडम केनेडी याने फुल टॉस चेंडू टाकला आणि ड्रेक्सचा फलंदाज अहमद नबी याने यावर एक शानदार शॉट मारला. मात्र, चेंडू जास्त लांब न जाता हवेत उंचीवर गेला. अशात चेंडू मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर पडणार होता. मात्र, जेसन तिथेच क्षेत्ररक्षण करत होता. त्याने शानदार डाईव्ह मारत चेंडू पकडला, पण चेंडू सीमारेषेवर लागण्यापूर्वीच त्याने मैदानात फेकला. तोपर्यंत जेकबही तिथे पोहोचला होता. मुल्डर याने पुढे येऊन शानदार झेल पकडला. मात्र, तोदेखील सीमारेषेच्या बाहेर चालला होता. अशात त्याने सहजरीत्या चेंडू हवेत फेकला आणि मैदानात येऊन पकडत झेल पूर्ण केला.

जेकबने झेल पकडताच संपूर्ण जेसननेही जल्लोष करण्यास सुरुवात केली. समालोचकांनाही या झेलावर विश्वास बसला नाही. सीआयवायएमएस संघाच्या खेळाडूंनी या विकेटचा जल्लोष करत जेसन आणि जेकब भोवती जमा झाले. या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1639452995812458501

एका युजरने कमेंट करत लिहिले की, “इतर क्षेत्ररक्षकाला सीमारेषा पार करण्याची आणि चेंडू हवेत फेकून पकडण्याची गरज नव्हती. हे स्पष्टरीत्या दिसत आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “भावाने आतापासूनच जल्लोष करण्यास सुरुवात केली. तिकडे दुसरा खेळाडू अजूनही झेल पूर्णपणे पकडत होता.” आणखी एकाने असे म्हटले की, “दुसरा गोलंदाज स्वत:च सीमारेषेच्या पलीकडे गेला. तो सहजरीत्या झेल पकडू शकत होता. त्यानंतर सीमारेषेवरून चेंडू आत टाकला.”

https://twitter.com/AnfreAnjar/status/1639453537817219072?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1639453537817219072%7Ctwgr%5E99bafc467260c748835d0b71630fe4474f484c9a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Fcricket%2Fcricket-news%2Fjason-van-der-merwe-and-jacob-mulder-took-sensations-riley-catch-near-boundary-in-european-club-match-2023-03-26

सामन्याबाबत बोलायचं झालं, तर सीआयवायएमएस संघाने प्रथम फलंदाजी करताना 3 विकेट्स गमावत 125 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ड्रेक्स संघाने 4 चेंडू शिल्लक ठेवत सामना नावावर केला. (cricketer jason van der merwe and jacob mulder took sensations riley catch near boundary in european club qualifier match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘फायनल खेळण्याची संधी दररोज मिळत नाही…’, WPL 2023च्या फायनलपूर्वी रोहितचा हरमनसेनेला खास संदेश
एमएस धोनीबाबत ‘गब्बर’ने केले मन जिंकणारे वक्तव्य; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम बरोबर बोलला भावा’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---