असे म्हणतात की, एखादा खेळाडू खेळ सोडतो, पण तो खेळ खेळणे कधीच विसरत नाही. असेच काहीसे इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्याबाबतही आहे. बेअरस्टो पायाच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून 7 महिने दूर राहिला. मात्र, जेव्हा त्याने पुनरागमन केले, तेव्हा त्याने पहिल्या सामन्यातच धमाका केला आहे. तसेच, एकसोबत दोन संदेश दिले आहेत. बेअरस्टोने नेमकं काय केलंय, चला जाणून घेऊयात…
विस्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्या दोन संदेशांबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण त्याच्या धमाकेदार खेळीविषयी जाणून घेऊयात. 33 वर्षीय बेअरस्टो याने पुनरागमन करत त्याच्या बॅटमधून यॉर्कशायर विरुद्ध नॉटिंघमशायर (Yorkshire vs Nottinghamshire) सामन्यात धुमाकूळ घातला आहे.
बेअरस्टोचा धमाका- 13 चौकार, 2 षटकार आणि 97 धावा
बेअरस्टोने यॉर्कशायर संघाकडून खेळताना 97 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 13 चौकार आणि 2 षटकारांचाही पाऊस पाडला. म्हणजेच, त्याने एकूण 15 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवले. या धावा त्याने एकूण 88 चेंडूंचा सामना करत चोपल्या.
https://www.instagram.com/reel/Cop2GOEhbBs/?utm_source=ig_embed&ig_rid=9a351f88-85a9-4cdf-9090-62de6364fda5
खरं तर, गोल्फ खेळताना पाय तुटल्यामुळे बेअरस्टो मागील वर्षी सप्टेंबरमध्ये क्रिकेटपासून दूर झाला होता. दुखापतीमुळे त्याला मागील वर्षी अनेक मोठ्या मालिकांमध्ये खेळता आले नव्हते. यामध्ये टी20 विश्वचषकाचाही समावेश होता. यावर्षी आयपीएल 2023मध्ये तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडूनही खेळू शकला नाही. आयपीएलमध्ये बेअरस्टोला पंजाबने 9.75 कोटी रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले होते.
We’ve missed this 💙
Welcome back @jbairstow21 🙌 #YorkshireFamily pic.twitter.com/CYMjQOqb9N
— Yorkshire CCC (@YorkshireCCC) April 25, 2023
मोठी खेळी करत दिले 2 संदेश
विशेष म्हणजे, यॉर्कशायर संघाकडून केलेल्या 97 धावांच्या दमदार खेळीनंतर त्याने दोन संदेश दिले आहेत. पहिला संदेश इंग्लंड क्रिकेट बोर्डाला ऍशेजसाठी संघ निवडण्यापूर्वी दिला आहे की, तो आता फिटही आणि हिटदेखील आहे. तसेच, दुसरा संदेश त्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला दिला आहे की, त्याचा सामना करण्यासाठी संघाने सज्ज राहावे.
https://www.instagram.com/reel/CrRIAvmA8-u/?utm_source=ig_embed&ig_rid=37f2daa1-738e-4eb9-871d-97dd530bf8c0
इंग्लंड क्रिकेट संघ त्यांच्या बझबॉल क्रिकेटसाठी खूपच प्रसिद्ध आहे. यातील जॉनी बेअरस्टो हा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने बझबॉलचे प्रदर्शन करत मागील वर्षी मायदेशात खेळताना इंग्लंडसाठी 5 डावात 75.66च्या सरासरीने 681 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 4 शतके आणि 1 अर्धशतकाचाही समावेश होता. (cricketer jonny bairstow hits 97 runs for yorkshire on leg injury comeback ahead of ashes)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रिपोर्टर, तुला लाज वाटली पाहिजे…’, संमतीशिवाय बातमी दिल्याने आर्चरच्या तळपायाची आग मस्तकात
निम्मी आयपीएल संपली, Points Tableमध्ये धोनीच्या चेन्नईचा जलवा, ‘या’ 3 संघांसाठी प्ले-ऑफची वाट खडतर