लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल याच्या दुखापतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध राहुलच्या खेळण्यावर जो सस्पेन्स होता, तो आता संपला आहे. त्याच्या दुखापतीविषयी समोर आलेल्या वृत्तानुसार, केएल राहुल हा एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध मैदानात उतरणार नाहीये. त्याच्या जागी कृणाल पंड्या लखनऊचे नेतृत्व करणार आहे.
एका क्रिकेट वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, केएल राहुल (KL Rahul) याची दुखापत गंभीर आहे. तसेच, त्याचा आयपीएल 2023 स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळण्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. असे म्हटले जात आहे की, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे वैद्यकीय पथकाचा निर्णय यामध्ये महत्त्वाचा असेल.
राहुलची दुखापत गंभीर
असा प्रश्न समोर उभा ठाकला आहे की, दुखापत गंभीर असताना राहुल सध्या कुठे आहे. तर राहुल हा सध्या लखनऊमध्ये संघासोबतच आहे. तिथे बुधवारी (दि. 3 मे) लखनऊ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 45वा सामना खेळला जाईल. राहुलला दुखापत झाली, तेव्हा तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध सामन्यात सीमारेषेजवळ चेंडूंचा पाठलाग करत होता.
चेन्नईविरुद्ध कृणाल पंड्या करणार नेतृत्व?
राहुल चेन्नईविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे हे स्पष्ट झाल्यानंतर कृणाल पंड्या (Krunal Pandya) हा लखनऊ संघाचा कर्णधार असेल. राहुलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध फलंदाजी केली होती. मात्र, जेव्हा क्षेत्ररक्षणावेळी तो दुखापतग्रस्त होऊन मैदानातून बाहेर गेला होता, तेव्हा नेतृत्व कृणालनेच केले होते.
डब्ल्यूटीसीचा भाग आहे राहुल, एनसीएमध्ये वैद्यकीय पथक घेणार निर्णय
खरं तर, राहुल हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताचा भाग आहे. अशात त्याची दुखापत आयपीएलमध्ये खेळण्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळए एनसीएचे वैद्यकीय पथक जो सल्ला देईल, तो बीसीसीआय आणि लखनऊ संघाला मान्य करावा लागेल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, राहुलला सूजेची दुखापत आहे. एनसीए आणि बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याचे स्कॅन करेल, त्यानंतर त्याच्या दुखापतीची वास्तविकता समजेल. हे निश्चित आहे की, तो चेन्नईविरुद्ध खेळणार नसून पुढील सामन्यातही लखनऊसाठी खेळणार नाही. अशात हा लखनऊ संघासाठी धक्का मानला जात आहे. (cricketer kl rahul injury update bcci take final call for further participation krunal pandya to lead vs csk)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू माझ्या कुटुंबाला शिवी दिली’, विराट आणि गंभीरमध्ये काय बाचाबाची झाली? एका क्लिकवर घ्या जाणून
दिल्लीच्या तिसऱ्या विजयानंतर वॉर्नरचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘माहिती नाही आमच्या फलंदाजीला…’