नेदरलँड संघाविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात इंग्लंड संघाने वर्चस्व राखले. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४९८ धावा ठोकत वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली. हे आव्हानाचा उभं करण्यासाठी इंग्लंडच्या एक नाही, तर ३ फलंदाजांनी वैयक्तिक शतक पूर्ण केले. फिल सॉल्ट (१२२), डेविड मलान (१२५) आणि जोस बटलर (१६२) या खेळाडूंनी शतक झळकावले. मात्र, स्टेडिअममध्ये सर्वांचे मनोरंजन कुणी केले असेल, तर ते म्हणजे लियाम लिविंगस्टोन याने.
एकाच षटकात चोपल्या ३२ धावा
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपला फॉर्म कायम राखला आहे. त्याने नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २२ चेंडूत ६६ धावा चोपल्या. या तडाखेबंद खेळीमुळे अनेक विक्रम रचले गेले. मात्र, ४६व्या षटकात फिरकीपटू फिलिप बोसवेन याच्या गोलंदाजीवर त्याने चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडला. या षटकात त्याने प्रत्येक चेंडू बाऊंड्रीच्या पलीकडे पाठवला. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर त्याने सलग ३ षटकार खेचले आणि त्यानंतर पुन्हा चौकार मारला. पुढे शेवटच्या चेंडूवरही त्याने षटकार मारला.
https://twitter.com/MSDianMrigu/status/1538029257519034370
१७ चेंडूत झळकावली फिफ्टी
लियाम लिविंगस्टोन याने १७ चेंडूत अर्धशतक झळकावले. तो एक चेंडूने मागे पडला, नाहीतर त्याने वनडे इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले असते. तसेच, एबी डिविलियर्सच्या विक्रमाची बरोबरी केली असती. मात्र, तो सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा इंग्लंडचा क्रिकेटपटू बनला आहे. बटलरने ४७ चेंडूत शतक झळकावले. हे इंग्लंडच्या फलंदाजाने केलेले दुसरे वेगवान शतक होते. त्याने नाबाद १६२ धावांची खेळी केली. यामध्ये संघाच्या २६ पैकी १४ षटकार हे बटलरच्या बॅटमधून निघाले होते.
विक्रमांची रचली भिंत
राष्ट्रीय संघाकडून खेळताना बटलरच्या नावावर आता ३ सर्वात वेगवान शतके झाले आहेत. त्याने ४६ चेंडू, ४७ चेंडू आणि ५० चेंडूत शतके ठोकली आहेत. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात सॉल्टने ९३ चेंडूत १२२ धावा आणि मलान याने १०९ चेंडूत १२५ धावा चोपल्या. दुसरीकडे, लियाम लिविंगस्टोन याने २२ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. नेदरलँड पहिल्यांदाच विश्वचषकाबाहेर इंग्लंडविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! सर्वात मोठी धावसंख्या, सर्वाधिक षटकार, नेदरलँडविरुद्ध इंग्लंडने रचले अर्धा डझन विक्रम
आवेश खानने वडिलांना समर्पित केल्या आपल्या ४ विकेट्स, कारण जाणून तुम्हीही ठोकाल सलाम!





