---Advertisement---

IPL संघांनो सावधान! 2 वर्ल्डकप जिंकणारा खेळाडू होणार KKRच्या ताफ्यात सामील, कोण आहे तो?

On: गुरूवार, मे 4, 2023 11:17 AM
Kolkata-Knight-Riders
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेने अर्धा टप्पा पार केला आहे. स्पर्धेतील 46 सामने पार पडले आहेत. 47वा सामना सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघात नवीन खेळाडूची एन्ट्री होणार आहे. याची माहिती स्वत: केकेआर संघाने दिली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने गुरुवारी (दि. 4 मे) घोषणा केली की, जॉनसन चार्ल्स ताफ्यात सामील झाला आहे. त्याला लिटन दास (Litton Das) याच्या बदली खेळाडूच्या रूपात संघात जागा मिळाली आहे. लिटन कौटुंबिक कारणांमुळे घरी परतला आहे. त्यामुळे लिटन दास आयपीएल 2023मधून बाहेर (Litton Das out of ipl 2023 ) पडला आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्याच्या घरी परतला.

कोलकाताने पुष्टी करत म्हटले की, “लिटन दासला 28 एप्रिल रोजी सकाळी बांगलादेशला परतावे लागले. कारण, त्याच्या कुटुंबात वैद्यकीय आणीबाणी होती. आमच्या प्रार्थना लिटन दास आणि त्याच्या कुटुंबासोबत आहेत, जेणेकरून तो या कठीण काळातून सावरू शकेल.”

खरं तर, लिटन दास याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत फक्त एक सामना खेळला होता. तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात उतरला होता. यामध्ये त्याने 4 धावा केल्या. तसेच, 2 खेळाडूंना यष्टीचीत केले. कोलकाताला दिल्लीविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता.

लिटन एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात कोलकाता संघात सामील झाला होता. त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त होता. लिटनच्या बांगलादेश संघाचा सहकाही शाकिब अल हसन याने स्पर्धेपूर्वीच आपले नाव मागे घेतले होते.

लिटनचा बदली खेळाडू
जॉनसन चार्ल्स हा वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने 41 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्याने 971 धावाही केल्या आहेत. तो 2012 आणि 2016च्या आयसीसी टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. याव्यतिरिक्त चार्ल्सने 224 टी20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 5600हून अधिक धावा केल्या आहेत. चार्ल्स याला कोलकाता संघाने 50 लाख रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले आहे. मात्र, त्याची भारतात पोहोचण्याची तारीख अद्याप निश्चित नसल्यामुळे तो हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाहीये. (cricketer litton das out of ipl 2023 kolkata knight riders announced johnson charles as his replacement)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो फक्त दिसायलाच छोटाये, पण…’, मॅचविनर पठ्ठ्यासाठी रोहितने उधळली स्तुतीसुमने
मुंबईविरुद्ध काळीज तोडणारा पराभव होताच धवनची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘दुर्दैवाने आम्ही…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---