रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सन २००८मधील इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून विजेतेपदासाठी तरसतोय. संघात एकापेक्षा एक खेळाडू असूनही त्यांना ही कामगिरी करता आली नाही. मात्र, आयपीएल २०२२च्या हंगामात त्यांनी चमकदार कामगिरी करत क्वालिफायर २मध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये त्यांचा सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध पहिला क्वालिफायर सामना पराभूत झालेल्या राजस्थान रॉयल्स संघाबरोबर होणार आहे. या हंगामात हे दोन संघ जेव्हा एकमेकांविरुद्ध भिडले होते, तेव्हा बेंगलोरने राजस्थानला ४ विकेट्सने पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात राजस्थानने बेंगलोरला २९ धावांनी पराभूत केले होते. अशात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने बेंगलोरला पाठिंबा दिला आहे.
अशात फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे फार सोपे नव्हते. बेंगलोर संघ १६ गुणांसह चौथ्या स्थानावर होता. मात्र, संघाच्या प्लेऑफच्या वाटेत दिल्ली कॅपिटल्स संघ १४ गुणांसह उभा होता. जर दिल्लीने सामना जिंकला असता, तर ता प्लेऑफसाठी क्वालिफाय झाला असता. मात्र, मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीला पराभूत करत स्पर्धेतून बाहेर केले. त्यानंतर बेंगलोरने लखनऊ सुपर जायंट्स संघाला १४ धावांनी पराभूत करत क्वालिफायर २ सामन्यात जागा पक्की केली.
बेंगलोरने एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नसली, तरीही त्यांचा चाहतावर्ग फारच मोठा आहे. ते नेहमीच बेंगलोरला पाठिंबा देताना दिसतात. अशात ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त फलंदाज मार्नस लॅब्यूशेन (Marnus Labuschagne) यानेही बेंगलोरला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
क्वालिफायर २ सामन्यापूर्वी लॅब्यूशेनने आपल्या आवडत्या संघाचेही नाव सांगितले आहे. जेव्हा एका चाहत्याने लॅब्यूशेनला ट्विटरवर विचारले की, तो कोणाला सपोर्ट करत आहे, तेव्हा त्याने उत्तर दिले की, “रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर.” त्याने असेही सांगितले की, विराट कोहली मोठी धावसंख्या करेल.
RCB – @imVkohli will go big
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) May 26, 2022
— Tanuj Singh (@ImTanujSingh) May 26, 2022
लॅब्यूशेनने आयपीएल २०२२च्या लिलावातही आपले नाव दिले होते. मात्र, त्यांना कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हसरंगाचा ‘तो’ झेल वैध की अवैध? वाचा काय सांगतो नियम
शतक एक विक्रम अनेक! रजत पाटीदारच्या जबराट सेंच्युरीने पाडला विक्रमांचा पाऊस, टाका एक नजर