इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत अनेक युवा खेळाडू खेळत आहेत. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळत आहे. तसेच, क्रिकेटमधील अनेक गोष्टीही शिकत आहेत. तसेच, जे खेळाडू या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत, त्यांच्याविषयी आजी-माजी खेळाडू मते व्यक्त करत आहेत. अशात शनिवारी (दि. 6 मे) आयपीएल 2023चा 49वा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमने-सामने होते. हा सामना चेन्नईने 6 विकेट्सने जिंकला. या विजयानंतर दमदार कामगिरी करणाऱ्या चेन्नईच्या मथीशा पथिराना याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने त्याच्याविषयी मोठे भाष्य केले.
टी20 क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी
चेन्नई विरुद्ध मुंबई (Chennai vs Mumbai) सामन्यात मुंबई संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी चेन्नईकडून युवा गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) याने उच्च दर्जाची गोलंदाजी केली. त्याने टी20 क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन करत 4 षटकात 15 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स चटकावल्या. या सामन्यात त्याने नेहाल वढेरा, ट्रिस्टन स्टब्स आणि अर्शद खान यांची विकेट काढली.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1654851790159089664
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Chennai Super Kings vs Mumbai Indians) संघातील सामन्यानंतर कर्णधार एमएस धोनीने मथीशा पथिरानाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली. धोनीला वाटते की, पथिरानाने कसोटी क्रिकेटपासून दूर राहिले पाहिजे.
पथिरानाविषयी धोनीचे वक्तव्य
पथिरानाविषयी बोलताना धोनी म्हणाला की, “मला वाटते की, त्याने (मथीशा पथिराना) कसोटी क्रिकेटपासून दूर राहावे. तसेच, आयसीसी स्पर्धांवर लक्ष केंद्रित करावे. जर असे झाले, तर तो श्रीलंका क्रिकेटसाठी मोठी संपत्ती ठरेल. मागील हंगामात त्याचे प्रदर्शन सरासरी होते, पण या हंगामात त्याने शानदार कामगिरी केली आहे.”
https://twitter.com/IPL/status/1654907249368895488
सामन्याचा आढावा
या सामन्यात मुंबईने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. यावेळी मुंबईने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 139 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने शानदार फलंदाजीच्या जोरावर 17.4 षटकात 4 विकेट्स गमावत 140 धावा चोपल्या. तसेच, या विजयासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत 11 सामन्यांनंतर 13 गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. (cricketer matheesha pathirana should not even get close to red ball cricket ms dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जितेश लवकरच भारतीय संघात दिसेल”, निवडसमिती सदस्याचे सूचक विधान
बाबर आझमला नाही आवडत विराट कोहली! सांगितली मॉडर्न डे क्रिकेटमधील चार सर्वोत्तम नावे






