ऍशेस मालिकेला शुक्रवारपासून (दि. 16 जून) सुरुवात होणार आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ या मालिकेत आमने-सामने असणार आहेत. इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाला धक्का देत दोन दिवसाआधीच आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. त्यानी कसोटीत निवृत्ती माघारी घेणाऱ्या अष्टपैलू मोईन अली याला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. मात्र, मोईनला संघात सामील करणे इंग्लंडचेच माजी कर्णधार माईक एथर्टन यांना पटले नाहीये. ते इंग्लंड व्यवस्थापनावर नाराज आहेत.
काय म्हणाले एथर्टन?
इंग्लंडचे माजी कर्णधार माईक एथर्टन (Former England captain Mike Atherton) यांनी माध्यमांशी बोलताना मोईन अली (Moeen Ali) याच्याविषयी परखड मत मांडले. ते म्हणाले की, “मी मोईनला या मालिकेसाठी निवडले नसते. मात्र, मी बेन स्टोक्स नाहीये. मोईन अली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन परत आला आहे. त्याने सप्टेंबर 2021पासून कसोटी क्रिकेट खेळले नाहीये. त्यामुळेच मला त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करायचे नव्हते.”
पुढे बोलताना एथर्टन म्हणाले की, “अशा सामन्यात तुम्हाला अशा खेळाडूला खेळवण्याची गरज असते, जो तुमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिट बसेल. तसेच, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भरपूर क्रिकेट खेळले आहे. मात्र, तुम्ही मोईन अलीला पाहा, त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणताच मोठा विक्रम नाहीये. निवृत्तीपूर्वीही कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी फार चांगली राहिली नाहीये.”
मोईन अलीची कारकीर्द
खरं तर, मोईन अली (Moeen Ali Career) याने इंग्लंडसाठी आतापर्यंत 64 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 111 डावात फलंदाजी करताना 2914 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याची सरासरी खास नव्हती. त्याने जवळपास 28.29च्या सरासरीने धावा कुटल्या. त्याच्या नावावर एकूण 5 शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त गोलंदाजी करतानाही त्याने आतापर्यंत 112 डावात एकूण 195 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 36.66 इतकी राहिली आहे. (cricketer moeen ali inclusion in first test of ashes 2023 michael atherton said this read here)
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापूर्वी ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूने तडकाफडकी घेतली निवृत्ती, 7 विश्वचषकात केलं देशाचं प्रतिनिधित्व
दिमाखदार सोहळ्यासह MPL 2023 ची सुरुवात, अमृता खानविलकरच्या परफॉर्मन्सने चाहते मंत्रमुग्ध