इंग्लंड संघ आपला अपूर्ण दौरा पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. इथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (दि. 19 नोव्हेंबर) सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 72 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडच्या हाती सलग दोन पराभव लागले. त्यामुळे त्यांच्या हातातून मालिकाही गेली. या सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व मोईन अली करत होता. यावेळी त्याने पराभवाचे कारणही सांगितले.
मोईन अलीने पराभवाचे खापर कुणावर फोडले?
मोईन अली (Moeen Ali) याने इंग्लंड संघाचा पराभव कशामुळे झाला याचे कारण सांगितले. तो म्हणाला की, “आम्ही फलंदाजीत चांगल्या स्थितीत होतो. मात्र, आम्ही विकेट्स गमावल्या. रशीदने मधळ्या टप्प्यात चांगली गोलंदाजी केली. आम्ही सामना चांगल्याप्रकारे सामना खेचला होता. खेळपट्टी खरंच फलंदाजांसाठी सोपी झाली होती, पण आम्ही विकेट्स गमावले. हेच पराभवाच्या कारणांपैकी एक आहे. त्यांनी त्या टप्प्यात चांगली गोलंदाजी केली आणि आमच्यावर दबाव आला.”
Australia ensure a series victory with another thumping win 👏
Watch the #AUSvENG ODI series LIVE on https://t.co/MHHfZPzf4H (in select regions) 📺
📝 Scorecard: https://t.co/C3d30LtqwI pic.twitter.com/YKAfDhghSz
— ICC (@ICC) November 19, 2022
पुढे बोलताना तो म्हणाला की, “जर तुम्ही नियमितरीत्या विकेट्स गमावल्या, तर अधिक सामने जिंकू शकणार नाही. तिसऱ्या वनडे सामन्यासाठी सकारात्मकेने जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल.”
सामन्याचा आढावा
विशेष म्हणजे, पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 280 धावांचा डोंगर उभा केला होता. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ याने झुंजार खेळी साकारली. त्याने 94 धावा चोपल्या. यावेळी आदिल रशीद याने इंग्लंडसाठी 3 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाच्या या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला छाप सोडता आली नाही. एकापाठोपाठ एक असे खेळाडू नियमित अंतराने तंबूत परतले. शेवटी इंग्लंड संघाचा डाव 38.5 षटकात 208 धावांवर संपुष्टात आला. मिचेल स्टार्क याने घातक गोलंदाजी प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्स मिळवून दिल्या. त्याच्याव्यतिरिक्त ऍडम झम्पा यानेही 4 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दोन सामने जिंकत मालिका खिशात घातली. (cricketer moeen ali reveals the reason of england defeat in 2nd odi against australia)
उभय संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 22 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरेरे! ज्या दिग्गजांना न्यूझीलंडमध्ये जास्त डिमांड, त्यांनाच अश्विनने प्लेइंग इलेव्हनमधून काढले बाहेर
कमाईच्या बाबतीत बीसीसीआय सर्वांचा बाप! पाकिस्तान तर आसपासही नाही, 2021मध्ये कमावले ‘एवढे’ कोटी