जगातील दिग्गज क्षेत्ररक्षकांमध्ये भारतीय संघातील काही खेळाडूंचा समावेश होतो. त्यात रवींद्र जडेजा याचे नावही येते. जडेजा फलंदाजी, गोलंदाजीसोबतच त्याच्या अस्सल क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जातो. त्यामुळेच जेव्हाही तो गोलंदाजी करताना कोणत्याही खेळाडूने झेल सोडला, तर त्याला राग अनावर झाल्याशिवाय राहत नाही. असेच काहीसे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात घडले. मोहम्मद सिराजने जडेजाच्या गोलंदाजीवर झेल सोडला, पण समालोचन करत असलेले माजी भारतीय दिग्गज सुनील गावसकर यांनी जे काही म्हटले, त्याचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, हा झेल कठीण होता, परंतु यानंतर त्यांना जडेजाचेही दु:ख समजले. त्यांनी यावेळी मन जिंकणारे वक्तव्य केले. झाले असे की, ऑस्ट्रेलियाच्या डावातील 20वे षटक रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) टाकत होता. यावेळी जडेजाच्या अखेरच्या चेंडूवर डेविड वॉर्नर याने फटका मारल्यानंतर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने डाईव्ह मारली, पण तो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे जडेजा खूपच संतापला. यावेळी पाहुण्या संघाला 2 धावा मिळाल्या.
काय म्हणाले गावसकर?
हा क्षण पाहून समालोचन करणारे गावसकर म्हणाले की, “सिराजला आपण मागील 2-3 वर्षांमध्ये पाहिले आहे की, त्याला अद्याप ती कला जमू शकली नाहीये. त्याने या झेलासाठी उशिरा धावण्यास सुरुवात केली. हा कठीण झेल होता, हा कोणत्याही बाजूने सोपा झेल नव्हता. त्याने उशिरा धावायला सुरुवात केली, त्यामुळे त्याला डाईव्ह मारावी लागली. जडेजाच्या रागाबाबत एवढंच बोलू शकतो की, हे तुझ्या मानकाप्रमाणे नसू शकते. तुझे मानक तर आकाशाइतके उंच आहेत.”
https://twitter.com/MainDheetHoon69/status/1638480371804409866?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1638480371804409866%7Ctwgr%5E929804284a2d05ea622bd3669a38ed05a6efc4f3%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-ind-vs-aus-mohammad-siraj-dropped-catch-ravindra-jadeja-got-angry-but-sunil-gavaskar-comment-won-hearts-watch-video-7930748.html
सामन्याचा आढावा
ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 10 विकेट्स गमावत 269 धावा केल्या. यावेळी त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला वगळले, तर त्यांच्या प्रत्येक खेळाडूने दोन आखडी धावसंख्येचे योगदान दिले होते. तसेच, भारताकडून गोलंदाजी करताना दोन गोलंदाजांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यामध्ये कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. (cricketer mohammad siraj dropped catch ravindra jadeja got angry but sunil gavaskar comment won hearts see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’चा भीमपराक्रम! बनला आशियामध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा 8वा भारतीय, जाणून घ्याच
Video: कुलदीपच्या ‘त्या’ कृत्यामुळे रागाने लाल झाला कॅप्टन रोहित, लाईव्ह सामन्यात सर्वांसमोर केला बाजार