Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘जडेजा आणि माझा फक्त एकच प्लॅन होता…’, वानखेडेत वादळ आणणाऱ्या राहुलकडून रणनीतीचा खुलासा

'जडेजा आणि माझा फक्त एकच प्लॅन होता...', वानखेडेत वादळ आणणाऱ्या राहुलकडून रणनीतीचा खुलासा

March 18, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ravindra-Jadeja-And-KL-Rahul

Photo Courtesy: bcci.tv


भारताचा सलामीवीर केएल राहुल याने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात खराब कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्यावर सर्व बाजूंनी टीकेची झोड उठली होती. त्यामुळे त्याला 4 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यातून बाहेर बसवण्यात आले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत राहुलने आपल्या बॅटमधून असा काही धावांचा पाऊस पाडला की, टीकाकारांचीही बोलती बंद झाली. शुक्रवारी (दि. 17 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयात राहुलचे मोलाचे योगदान होते.

वानखेडे स्टेडिअममध्ये रंगलेल्या पहिल्या सामन्यात केएल राहुल (KL Rahul) भारतासाठी संकटमोचक बनला. त्याने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यासोबत नाबाद शतकी भागीदारी रचत संघाला 39.5 षटकातच सामना जिंकून दिला. या विजयानंतर राहुल काय म्हणाला चला जाणून घेऊया.

भारतीय संघाला विजयासाठी पहिल्या वनडे सामन्यात 189 धावांचे आव्हान मिळाले होते. यावेळी भारताची सुरुवात निराशाजनक झाली. संघाने झटपट आपले तीन मोठे खेळाडू गमावले होते. यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हादेखील मोठी खेळी साकारू शकला नाही. दुसरीकडे, राहुल आणि जडेजाने डाव सांभाळला आणि विजय मिळवून दिला. राहुलने यादरम्यान अर्धशतक ठोकले, जे त्याच्या वनडे कारकीर्दीतील 13वे अर्धशतक होते.

7⃣5⃣* Runs
9⃣1⃣ Balls
7⃣ Fours
1⃣ Six

That was one brilliant knock in the chase from @klrahul 👌 👌 #TeamIndia | #INDvAUS

Watch 🎥 🔽https://t.co/ii33uhbPv1

— BCCI (@BCCI) March 17, 2023

केएल राहुलची प्रतिक्रिया
या सामन्यात राहुलने 91 चेंडूत 75 धावांची वादळी खेळी साकारली. यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. या विजयी खेळीनंतर राहुलने त्याच्या आणि जडेजाच्या खास रणनीतीविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, “आमच्या विकेट्स लवकर पडल्या होत्या. स्टार्कचा चेंडू स्विंग होत होता. मात्र, सुरुवातीच्या चौकारांनी मला लवकर सेट होण्यास मदत केली. जडेजासोबत कमालीची भागीदारी झाली. आम्ही मैदानावर खेळताना काही वेगळी चर्चा करत नव्हतो. आमचा फक्त हा उद्देश होता की, जो खराब चेंडू येईल, त्यावर धावा काढायच्या. त्याने खूप चांगली खेळी साकारली. त्याला त्या स्थानावरील त्याची भूमिका चांगल्याप्रकारे माहितीये.”

भारताचा 5 विकेट्सने विजय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात आलेला हा सामना खूपच रोमांचक राहिला. या सामन्यात केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. दोघांनीही नाबाद 108 धावांची शतकी भागीदारीचे दर्शन घडवले. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 35.4 षटकात 188 धावांवर ढेपाळला होता. त्यानंतर भारताने 189 धावांचे आव्हान 39.5 षटकात पूर्ण करत 5 विकेट्सने जिंकला. (cricketer kl rahul reveals plan with ravindra jadeja ind vs aus 1st odi must read)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो कॅचसाठी पळत नाही, चेंडू स्वत:च…’, जडेजाने अफलातून कॅच पकडताच धोनीचं ‘ते’ ट्वीट व्हायरल
‘बोला था ना बंदे में है दम…’, म्हणत राहुलच्या झुंजार खेळीवर हरभजन फिदा, तर सेहवाग म्हणाला…


Next Post
Virat-Kohli-And-Hardik-Pandya

कॅप्टन्सी मिळताच पंड्या बनला घमंडी, चालू सामन्यात विराटला दिली वाईट वागणूक? व्हिडिओ पाहाच

Kane-Williamson

'रोज उठा, अंघोळ करा, विलियम्सनचं कौतुक करा आणि झोपून जा', सचिनची बरोबरी करताच भारतीय दिग्गजाकडून कौतुक

KL-Rahul

आधी राहुलला नाही तसलं बोलला भारतीय दिग्गज, आता वादळी खेळी पाहून म्हणाला, 'दबावातही चांगला खेळलास...'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143