---Advertisement---

मोठी बातमी! भारतीय संघाच्या हुकमी एक्क्याला चढावी लागली कोर्टाची पायरी, काय लागला निकाल? लगेच वाचा

On: बुधवार, सप्टेंबर 20, 2023 9:56 AM
Team-India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला येत्या 22 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी आपला संघही जाहीर केला आहे. मात्र, या मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या एका खेळाडूला न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. या खेळाडूवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप होता. मात्र, आता खेळाडूला न्यायालयाकडून मोठी दिलासा मिळाला आहे. एका न्यायालयाने या खेळाडूला पत्नीने लावलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपात जामीन दिला आहे.

न्यायालयात पोहोचला भारतीय खेळाडू
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला मोठा दिलासा मिळाला आहे. कोलकाताच्या एका कनिष्ठ न्यायालयात त्याची पत्नी हसीन जहां (Hasin Jahan) हिने लावलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात मोहम्मद शमीला जामीन (Mohammed Shami Bail) देण्यात आला आहे. शमीचा मोठा भाऊ मोहम्मद हसीब यालाही मंगळवारी (दि. 19 सप्टेंबर) याच न्यायालयाने जामीन दिला. मंगळवारी दोघे भाऊ या न्यायालयात हजर झाले होते, जिथे त्यांच्या वकिलाने जामिनाची याचिका दाखल केली, जिला मंजुरी मिळाली आहे.

मोहम्मद शमीवर लावले होते गंभीर आरोप
मार्च 2018मध्ये मोहम्मद शमी याच्यावर त्याच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तिने तक्रार नोंदवताना शमीवर शारीरिक अत्या’चाराचा आरोपही लावला होता. पोलिसांनी या प्रकरणात शमी आणि त्याच्या मोठ्या भावाची चौकशी केली हती आणि दोघांविरुद्ध अटक वॉरंटही जारी केले होते. मात्र, कोलकाताच्या एका कनिष्ठ न्यायालयाने त्या वॉरंटवर स्थिगिती आणली होती. यानंतर हसीन जहांने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत कोलकाताच्या उच्च न्यायालयाचे दारही ठोठावले. मात्र, उच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवला होता.

https://twitter.com/magical_wrists/status/1704178591267746103

त्यानंतर तिने उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाकडे प्रकरण पाठवले आणि या प्रकरणात सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर अंतिम निर्णय देण्याचे निर्देश दिले.

पत्नीला मासिक देखभाल भत्ता
यावर्षी जानेवारीमध्ये न्यायालयाने मोहम्मद शमी याला त्याची पत्नी हसीन जहां हिला 1.30 लाख रुपयांचा मासिक देखभाल भत्ता देण्याचा आदेश दिला होता. यामध्ये 50 हजार रुपये वैयक्तिक देखभाल भत्त्याच्या रुपात, तर उर्वरित 80 हजार रुपये त्याच्या मुलीच्या पालनपोषणासाठी दिले होते. शमीची मुलगी हसीन जहांसोबत राहते. (cricketer mohammed shami gets bail in domestic violence case before odi world cup 2023)

हेही वाचाच-
धक्कादायक! 3 भारतीयांचा समावेश असलेल्या मॅच फिक्सिंग रॅकेटचं भांडं फुटलं, आयसीसीची मोठी कारवाई
स्टार खेळाडू टीम इंडियात पुनरागमनासाठी तयार! मागच्या वर्षी खेळला होता शेवटचा सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---