अनेक खेळाडू असे असतात, जे नेहमीच त्यांच्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. मात्र, ते जेव्हा फलंदाजीला येतात, तेव्हा त्यांची फलंदाजी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. असेच काहीसे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान पाहायला मिळाले. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने नागपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गगनचुंबी षटकार खेचत सर्वांचे लक्ष वेधले. शमी त्याच्या भेदक वेगवान गोलंदाजीसाठी ओळखळा जातो. मात्र, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात त्याने फिरकीसाठी फायदेशीर असलेल्या खेळपट्टीवर धमाकेदार खेळी साकारत सर्वांची मने जिंकली. त्याने विरोधी संघाच्या सर्वात यशस्वी ठरलेल्या टॉड मर्फी याच्या गोलंदाजीविरुद्ध 3 षटकार मारत त्यालाही घाम फोडला.
शमीचे जबरदस्त षटकार
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 70 धावांवर बाद झाल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी त्याने मैदानावर पाऊल टाकताच आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने यादरम्यान एकूण 47 चेंडू खेळले. यात त्याने 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावांची खेळी साकारली. यावेळी खास बाब अशी की, शमीने तिन्ही षटकार हे फिरकीपटू टॉड मर्फी (Todd Murphy) याच्या गोलंदाजीवर मारले. मर्फीला घाम फोडत शमीने पहिला षटकार गुडघ्यावर बसून मारला होता. त्याचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
— Nitin Varshney (@NitinVa90573455) February 11, 2023
#Shami bhai ne mara chhakka,#Murphy reh gaya hakka bakka!#CricketTwitter #BGT2023 #INDvsAUS pic.twitter.com/dhDpG73OpG
— Asli BCCI Women (@AsliBCCIWomen) February 11, 2023
शमी विराट कोहली आणि राहुल द्रविडच्याही पुढे
मोहम्मद शमी याने यावेळी षटकार मारत खास विक्रमही नावावर केला. खरं तर, कसोटी सामन्यात षटकार मारण्याच्या बाबतात शमी याने विराट कोहली (Virat Kohli) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांसारख्या दिग्गजांनाही पछाडले आहे. शमीने कसोटीत 25 षटकार मारले आहेत. दुसरीकडे, विराटने कसोटीत 24 षटकार, तर राहुल द्रविड 21 षटकार मारले आहेत.
टॉड मर्फीची गोलंदाजी
टॉड मर्फीच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने पदार्पणातच मैदान गाजवले आहे. तो भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करताना सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. त्याने पहिल्या डावात भारताविरुद्ध गोलंदाजी करताना 47 षटके गोलंदाजी करताना 124 धावा खर्च करत 7 विकेट्स घेतल्या. यामध्ये भारताच्या वरच्या फळीतील पाचपैकी चार विकेट्स त्यानेच घेतल्या होत्या. (cricketer mohammed shami hit todd murphy for 3 big sixes ind vs aus 1st test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूरमध्ये भारताचे पारडे जड! कसोटीच्या पहिल्या डावात घेतली तब्बल ‘इतक्या’ धावांची आघाडी
कपिल देवपेक्षा जडेजा-अश्विनचे प्रदर्शन वरचढ! नागपूर कसोटीत रचला गेला नवा विक्रम