टी20 क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजच्या ओडियन स्मिथ या खेळाडूचाही समावेश होतो. या अष्टपैलू खेळाडूने आयपीएल 2022मध्ये पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान त्याने चांगली फटकेबाजी केली होती. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया संघातील 2 सामन्यांच्या टी20 मालिकेला बुधवारपासून (दि. 5 ऑक्टोबर) सुरुवात झाली. टी20 विश्वचषकापूर्वी लय मिळवण्यासाठी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. यादरम्यान वेस्ट इंडिजच्या स्मिथने मारलेल्या षटकाराचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधत आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 145 धावा चोपल्या होत्या. मात्र, हे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी 19.5 षटकात 7 विकेट्स गमावत पूर्ण केले. वेस्ट इंडिजने सामना गमावला असला, तरीही ओडियन स्मिथ (Odean Smith) याच्या षटकाराने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
जोस हेजलवूड (Josh Hazelwood) सध्या टी20 क्रमवारीतील अव्वल गोलंदाज आहे. मात्र, या सामन्यात स्मिथने त्याला पुरता घाम फोडला. स्मिथने त्याच्या चेंडूवर तब्बल 108 मीटरचा गगनचुंबी षटकार खेचला. 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्मिथने लाँग ऑनवर जबरदस्त षटकार खेचला. हा चेंडू भलताच लांब गेला होता. त्याचा हा षटकार पाहून पंच थेट नवीन चेंडू घेऊन मैदानावर आले होते. मात्र, चेंडू पुन्हा आला होता. या सामन्यात स्मिथने 17 चेंडूत 27 धावांची खेळी केली. या धावा करताना त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. तो शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला.
A 108m home-run! Odean Smith launches the ball into orbit! #AUSvWI#PlayOfTheDay | #Dettol pic.twitter.com/7bH8pEqDmp
— cricket.com.au (@cricketcomau) October 5, 2022
चौकारांपेक्षा जास्त खेचले षटकार
वेस्ट इंडिजच्या 25 वर्षीय ओडियन स्मिथने त्याच्या एकूण टी20 कारकीर्दीत चौकारांपेक्षा जास्त षटकार खेचले आहेत. त्याने या सामन्यापूर्वी खेळलेल्या 38 डावांमध्ये 17च्या सरासरीने 429 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने 19 चौकार आणि 39 षटकार मारले होते. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 141 इतका राहिला आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 43 इतकी आहे. तो तळातील फलंदाजी क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरतो.
ओडियन स्मिथला टी20 विश्वचषकासाठीच्या वेस्ट इंडिज संघात स्थान मिळाले आहे. त्याने टी20 कारकीर्दीत आतापर्यंत गोलंदाजी करताना 19 डावांमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच त्याने 133 धावाही चोपल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद 27 इतकी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इकडं सूर्या भाऊंची बॅट तळपली अन् तिकडं पाकिस्तानी फलंदाजाचं टेन्शन वाढलं, टी20 रँकिंगमध्ये घेतली गरुडझेप
ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर रोमांचक विजय; फिंचची ‘कॅप्टन्स इनिंग’