शुक्रवारी (दि. 07 जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर आयसीसी विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीच्या सुपर 6मधील 9वा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज संघ आमने-सामने होते. हा सामना श्रीलंका संघाने 8 विकेट्सने आपल्या खिशात घातला. या सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या महीश थीक्षणा याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. याव्यतिरिक्त श्रीलंकेच्या आणखी एका शिलेदाराने शतक झळकावत खास विक्रम रचला. तो फलंदाज म्हणजेच सलामीवीर फलंदाज पथुम निसांका होय.
सुपर 6 फेरीतील 9व्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज (Sri Lanka vs West Indies) संघातील नाणेफेक श्रीलंकन कर्णधार दसून शनाका (Dasun Shanaka) याने जिंकली. तसेच, गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 48.1 षटकात सर्व विकेट्स गमावत 243 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना महीश थीक्षणा याने 10 षटके गोलंदाजी करताना 34 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने 44.2 षटकातच 2 विकेट्स गमावत 244 धावा केल्या आणि सामना 8 विकेट्सने खिशात घातला. हा श्रीलंकेचा स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला. विशेष म्हणजे, श्रीलंका (Sri Lanka) संघाने आधीच विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी क्वालिफाय केले आहे. श्रीलंकेनंतर नेदरलँड संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला.
???????????? Sri Lanka remains undefeated! ????
The Lions are roaring with 7 wins out of 7 matches in the #CWC23 qualifier! ????????????#SLvWI #LionsRoar pic.twitter.com/sfBWJgCR40— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) July 7, 2023
श्रीलंकेकडून फलंदाजी करताना सलामीवीर पथुम निसांका (Pathum Nissanka) याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्याने यादरम्यान 113 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी साकारली. या धावा करताना त्याने 14 चौकारांचीही बरसात केली. त्याने दिमुथ करुणारत्ने (83) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी रचली. या सामन्यात शतक झळकावत निसांकाने विक्रम रचला. तो सलग दोन वनडे सामन्यात शतक झळकावणारा श्रीलंकेचा आठवा फलंदाज बनला. यापूर्वी त्याने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 101 धावांची खेळी साकारली होती.
निसांकाचा वनडे धमाका
पथुम निसांकाच्या वनडे क्रिकेटमधील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर तो वनडे क्रिकेटमधील सर्वात कमी डावांमध्ये 3 शतके झळकावणारा श्रीलंकेचा दुसरा फलंदाज बनला. निसांकाने त्याच्या कारकीर्दीतील 33व्या डावात तिसरे शतक झळकावले. श्रीलंकेकडून सर्वात कमी डावात 3 शतके ठोकण्याचा विक्रम उपूल थरंगा याच्या नावावर आहे. त्याने फक्त 21 डावांमध्ये 3 शतके झळकावली होती. लाहिरू थिरिमाने हा यादीत तिसऱ्या स्थानी असून त्याने 47 डावात 3 शतके झळकावली होती. (cricketer pathum nissanka hit century against west indies icc world cup qualifiers sl vs wi)
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! आशियाई क्रीडा स्पर्धांबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, लगेच वाचा
करियरचा 100वी कसोटी स्मिथनं यादगार बनवलीच! फिल्डिंर म्हणून कोरलं इतिहासात नाव