सर्व क्रिकेटप्रेमींना इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेपूर्वी महिला प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेचे वेध लागले आहेत. मात्र, त्यापूर्वी शनिवारी (दि. 9 डिसेंबर) मुंबईत डब्ल्यूपीएल 2024 लिलाव सुरू आहे. या लिलावात फीबी लिचफील्ड ही खेळाडू गुजरात जायंट्सच्या ताफ्यात सामील झाली. तिला बेस प्राईजपेक्षा तिप्पट रक्कम मिळाली. फीबी ही या लिलावात सोल्ड झालेली पहिली खेळाडू ठरली.
तिप्पट रक्कम
फीबीने डब्ल्यूपीएल 2024 लिलावात तिची बेस प्राईज 30 लाख रुपये ठेवली होती. मात्र, तिला बेस प्राईजच्या तिप्पट म्हणजेच तब्बल 1 कोटी रुपये मिळाले. आता ती गुजरात जायंट्स संघासाठी धावांचा पाऊस पाडताना दिसेल.
20 years old Phoebe Litchfield sold for 1 crore to Gujarat. #WPL2024 pic.twitter.com/nw8yK3WPzg
— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) December 9, 2023
फीबीची कारकीर्द
ऑस्ट्रेलियन फलंदाज फीबी लिचफील्ड हिने आंतरराष्ट्रीय पदार्पण करून फार काळ झाला नाहीये. तिने मागील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये भारताविरुद्ध टी20 पदार्पण केले होते. तसेच, जानेवारी 2023मध्ये पाकिस्तान महिला संघाविरुद्ध वनडे, तर जून 2023 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
तिने आतापर्यंत 1 कसोटी सामना, 11 वनडे सामने आणि 5 टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत तिने 69 धावा, वनडेत 344 आणि टी20त 99 धावा केल्या आहेत. (cricketer Phoebe Litchfield is the first player to be sold in WPL 2024 auction, joins Gujarat Giants for 1 crore rupees)
हेही वाचा-
Jio Cinema नाही, तर ‘इथे’ घेऊ शकता IND vs SA टी20 मालिकेचा आनंद, करावा लागणार नाही रुपयाही खर्च
‘शमीसारखा गोलंदाज कुठलाच प्रशिक्षक बनवू शकत नाही’, भारताच्या हुकमी एक्क्याविषयी कुणी केले भाष्य?