---Advertisement---

बापरे बाप! 9 चौकार, 17 षटकार अन् 55 चेंडूत 161 धावा; टी20 सामन्यात पंजाब किंग्सच्या वाघाचा धमाका

Punjab-Kings-IPL
---Advertisement---

आयपीएल 2023 स्पर्धेचा घाट 31 मार्चपासून घातला जाणार आहे. या स्पर्धेसाठी संघ आणि त्यांचे खेळाडू जोरदार तयारी करताना दिसत आहेत. तसेच, काही खेळाडू इतर स्पर्धांमध्ये खेळून एकप्रकारे फॉर्ममध्ये येताना दिसत आहेत. यामध्ये पंजाब किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज प्रभसिमरन सिंग याच्या नावाचाही समावेश आहे. डीवाय पाटील स्टेडिअममध्ये मंगळवारी (दि. 21 फेब्रुवारी) 17व्या डीवाय पाटील टी20 चषक स्पर्धेतील साखळी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पंजाब किंग्सच्या या पठ्ठ्याने वादळ आणले. त्याने केलेल्या कामगिरीमुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.

प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) याने त्याच्या खेळीत 55 चेंडूत 161 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने 9 चौकार आणि तब्बल 17 षटकारही भिरकावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर सीएजी (कॅग) संघाने इनकम टॅक्स संघाला 115 धावांनी पराभवाचा धक्का दिला. प्रभसिमरन याने आर संजयसोबत 117 धावांची सलामी भागीदारी रचली. त्याच्या खेळीच्या जोरावर कॅगने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 267 धावांचा महाकाय डोंगर उभा केला होता.

या आव्हानाचा पाठलाग करताना इकनम टॅक्स संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 152 धावाच केल्या. त्यात हिमांशू जोशीने 44 चेंडूत सर्वाधिक 50 धावांचे योगदान दिले, जे व्यर्थ ठरले. कॅगसाठी यावेळी मनू कृष्णन याने 4 (25), तर जे सुचित याने 3 (22) विकेट्स घेतल्या.

प्रथम श्रेणी कामगिरी
प्रभसिमरनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खूपच प्रभावित केले आहे. त्याने 11 सामने खेळताना 49.21च्या सरासरीने 689 धावा चोपल्या आहेत. त्यामध्ये 3 शतके आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 202 इतकी आहे. तसेच, 41 टी20 सामन्यात त्याने 37.29च्या सरासरीने 1156 धावा केल्या आहेत. टी20त त्याच्या नावावर 1 शतक (119) आणि 9 अर्धशतके आहेत.

आयपीएलमध्ये दाखवावी लागेल कमाल
अवघ्या 22 वर्षांच्या यष्टीरक्षक फलंदाज प्रभसिमरन याला अद्याप आयपीएलमध्ये जास्त संधी मिळाल्या नाहीयेत. त्याला 2019मध्ये पंजाब किंग्स संघाने 60 लाख रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले होते. यानंतर मागील हंगामातही त्याला रिटेन केले होते. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत फक्त 6 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 10.67च्या सरासरीने 64 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 16 आहे. मात्र, या खेळीनंतर त्याने यावर्षी संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये दावेदारी ठोकली आहे. (cricketer prabhsimran singh smashed 161 runs in just 55 balls with 17 sixes and nine boundaries)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग कोचने वाचला दिल्ली कसोटीतील चुकांचा पाढा; म्हणाले, ‘या देशात खेळता येत नसेल, तर…’

ऑस्ट्रेलियन दिग्गजाने धरले थेट कर्णधार कमिन्सला धारेवर! म्हणाले, “तू कमी पडतोय”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---