Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सीएसकेसाठी खूशखबर! हुकमी एक्का आयपीएल 2023 आधी झाला ‘सुपर फिट’, संघाला मोठ्या अपेक्षा

February 21, 2023
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या 16व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात कोणत्या संघात होणार हेदेखील ठरले आहे. ही स्पर्धा 31 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमने-सामने येणार आहेत. मात्र, स्पर्धेला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना संघासाठी एक खुशखबर समोर आली आहे.

आयपीएल 2023 साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. चेन्नई सुपर किंग्स पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकत आपला कर्णधार एमएस धोनी याला विजयी निरोप देण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी, संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहर हा पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे वृत्त समोर येत आहे. दीपक सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगलोर येथे पुनर्वसन करतोय.

चहर हा 2018 पासून संघाचा नियमित सदस्य असून, मागील वर्षी तो एकाही सामन्यात खेळू शकला नव्हता. तब्बल 14 कोटींची बोली त्याच्यावर सीएसकेने लावलेली. मात्र, स्ट्रेस फ्रॅक्चरमूळे तो पूर्ण आयपीएलला मुकला. त्यानंतर भारतातकडून त्याला पुनरागमन करण्यात यश आले. मात्र, त्याच्या दुखापतीने पुन्हा उचल खाल्ल्याने तो टी20 विश्वचषकातून बाहेर पडला होता. परंतु, आता त्याच्या पाठीची ही दुखापत पूर्णपणे बरी झाली असून, तो आयपीएलमधून पुन्हा मैदानात प्रवेश करेल.

आयपीएल 2023 साठी सीएसके संघ-

एमएस धोनी(कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलन, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, बेन स्टोक्स, भगत वर्मा, अजय मंडल, निशांत सिंधू, शेख रशीद, अजिंक्य रहाणे.

(Deepak Chahar Fit For IPL 2023 Good News For CSK)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिल नव्हेतर ‘हा’ फलंदाज वाटतो स्मिथला ‘फ्युचर सुपरस्टार’, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये
BREAKING: क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर मॉडेल सपना गिलकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल,‌‌ सेल्फी प्रकरण चिघळले (mahasports.in)


Next Post
Australia Team

"मी विनामोबदला ऑस्ट्रेलिया संघाला मदत करण्यासाठी तयार", समालोचन करत असलेल्या दिग्गजाची ऑफर

Australia-Cricket-Team

गंभीरने दाखवला ऑस्ट्रेलियाला पुनरागमनाचा मार्ग! म्हणाला, "एवढे करा जिंकाल"

Photo Courtesy: Twitter/ICC

टी20 फलंदाजी क्रमवारीत भारतीय पोरींचा बोलबाला! तब्बल 5 जणी टॉप-20 मध्ये

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143