---Advertisement---

गिल नव्हेतर ‘हा’ फलंदाज वाटतो स्मिथला ‘फ्युचर सुपरस्टार’, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये

On: मंगळवार, फेब्रुवारी 21, 2023 5:38 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा सध्या भारत दौऱ्यावर आहे. दौऱ्यावरील पहिल्या दोन्ही कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर स्मिथ याने नुकतीच एका क्रिकेट संकेतस्थळाला मुलाखत दिली. यामध्ये त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, त्याचवेळी क्रिकेटचा भविष्यातील सुपरस्टार कोण असा प्रश्न विचारला असता त्याने इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचे नाव घेतले.

स्मिथ याला वर्तमान क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. एका आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याला क्रिकेटचा फ्युचर सुपरस्टार शुबमन गिल की हॅरी ब्रुक असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने ब्रुकचे नाव घेतले. सध्या अनेक समीक्षक गिल हा पुढच्या पिढीतील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हणत असताना, स्मिथने ब्रुकचे नाव घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गिलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास दिसून येते की, तो नक्कीच भविष्यातील मोठा खेळाडू होऊ शकतो. सध्या केवळ 23 वर्षांचा असलेला गिल 13 कसोटीत एका शतकासह 736 धावा करू शकला आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडसारख्या कठीण खेळपट्ट्यांवर त्याने आपला उत्कृष्ट खेळ दाखवला होता. केवळ 21 वनडेत 1253 धावा करताना त्याने 73.76 अशी शानदार सरासरी राखली आहे. विशेष म्हणजे त्याच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय दुहेरी शतक देखील दिसते. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याची सरासरी 40 पेक्षा जास्त आहे. गिलने जानेवारी महिन्यात खेळतानाच तब्बल चार आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत.

दुसरीकडे ब्रुक गिलला काकणभर सरस दिसतो. नुकतीच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केलेल्या ब्रुकने 5 कसोटीत 77.87 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने हे सामने पाकिस्तान व न्यूझीलंडसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत खेळले. 20 टी20 मध्ये 137 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. आगामी आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळताना दिसेल.

(Steve Smith Choose Harry Brook As Future Superstar Ahead Shubman Gill) ‌

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत दौरा मध्येच सोडून जाणारा ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या पहिल्यांदाच बनला ‘बापमाणूस’, बाळाचं नावही केलं जाहीर
भारतीय संघाच्या जर्सीवर झळकणार ‘या’ आघाडीच्या ब्रँडचा लोगो! करार पक्का करण्यासाठी बीसीसीआय सज्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---