शारजाह येथे सोमवारी (दि. 27 मार्च) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची टी20 मालिका संपली. ही मालिका अफगाणिस्तानने 2-1ने नावावर केली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभव पत्करावा लागला. असे असले, तरीही रविवारी (दि. 26 मार्च) झालेल्या दुसऱ्या टी20त अफगाणिस्तानने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात अफगाणिस्तानच्या विजयाचा हिरो रहमानुल्लाह गुरबाज ठरला. त्याने यादरम्यान 44 धावांची शानदार खेळी साकारली.
गुरबाजचा गगनचुंबी षटकार
रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याने कठीण परिस्थितीत डाव सांभाळताना काही आक्रमक फटकेही मारले. यामध्ये एका षटकाराचाही समावेश होता. हा षटकार त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) याच्या गोलंदाजीवर मारला. गुरबाजने पूर्ण ताकदीने हा शॉट मारत चेंडू स्टेडिअमच्या बाहेर पाठवला. गुरबाजचा हा षटकार 98 मीटर लांबीचा होता. त्याचा हा शॉट पाहून गोलंदाजही हैराण झाला. यादरम्यानचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
रोमांचक सामन्यात अफगाणिस्तानची बाजी
कमी धावसंख्येच्या सामन्यात एकेवेळी अफगाणिस्तान संघाच्या हातून सामना निसटताना दिसत होता. संघाला शेवटच्या तीन षटकात 30 धावांची आवश्यकता होती. मात्र, मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह जदरान यांच्या शानदार खेळीच्या जोरावर अफगाणिस्तान संघ बाजी मारण्यात यशस्वी ठरला. नबीने 9 चेंडूत 14 धावा केल्या, तर नजीबुल्लाहने 12 चेंडूत 191च्या स्ट्राईक रेटने नाबाद 23 धावा केल्या. तसेच, 19.5 षटकात 133 धावा करत 7 विकेट्सने विजय मिळवला.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची कमाल
या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तान संघाचे फलंदाज अफगाणिस्तानच्या गोलंदाजांपुढे टिकू शकले नाहीत. संघाच्या 5 विकेट्स अवघ्या 63 धावांवर पडल्या होत्या. मात्र, इमाद वसीम याने खेळलेल्या 64 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 130 धावा केल्या. वेगवान गोलंदाज फजहलक फारुकी याने फक्त 19 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच, कर्णधार राशिद खान यानेही 4 षटके गोलंदाजी करताना 16 धावा खर्च करून 1 विकेट नावावर केली होती. (cricketer rahmanullah gurbaz sends ball out of stadium hitted huge six to naseem shah)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अब होगा तांडव! खतरनाक गोलंदाज राजस्थान संघात सामील, ‘हा’ खेळाडू बाहेर पडल्याने मिळाली सुवर्णसंधी
‘धोनीसारखी क्रेझ इतर कोणत्याही क्रिकेटपटूला नाही’, वर्कआऊट करताना पाहून फॅन्सचा जिमबाहेर राडा






