---Advertisement---

फ्लॉवर नहीं, फायर हैं! गुरबाजने पंड्याला ठोकले खणखणीत षटकार, स्वप्नातही विसरणार नाही कॅप्टन, Video

On: शनिवार, एप्रिल 29, 2023 6:12 PM
Hardik-Pandya-And-Rahmanullah-Gurbaz
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 हंगामात एकापेक्षा एक खेळाडू आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवताना दिसत आहेत. शनिवारी (दि. 29 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 39वा सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. गुजरात टायटन्स संघात रंगला. या सामन्यात कोलकाताचा स्टार फलंदाज जेसन रॉय फिट नसल्यामुळे त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याला संधी मिळाली. या अफगाणी फलंदाजाने संधीचे सोने करत संघाच्या बालेकिल्ल्यात वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्या गोलंदाजीवर खणखणीत दोन षटकार खेचले.

रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याने या सामन्यात 39 चेंडूत 81 धावांची तडाखेबंद खेळी केली. यामध्ये 5 चौकार आणि 7 षटकारांचाही समावेश होता. या 7 षटकारांमधील 2 षटकार हे हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या गोलंदाजीवर आले.

रहमानुल्लाह गुरबाज आणि हार्दिक पंड्या (Rahmanullah Gurbaz And Hardik Pandya) यांचा सामना कोलकाताच्या डावातील चौथ्या षटकात झाला. कोलकाताने पहिली विकेट गमावली होती. मात्र, तरीही गुरबाजने बेधडकपणे आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी हार्दिकने षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकला. मात्र, दुसऱ्याच चेंडूवर गुरबाजने पुल शॉट मारून षटकार खेचला. एवढेच नाही, तर या षटकातील चौथ्या चेंडूवरही गुरबाजने पंड्याला डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार मारला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

https://twitter.com/JioCinema/status/1652272001975992323?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1652272001975992323%7Ctwgr%5E9fb8db2a0b6eaeb986ddfd559147c12c92c845ce%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fwatch-rahmanullah-gurbaz-smashed-2-sixes-in-hardik-pandya-over-kkr-vs-gt-ipl-2023-121780

फक्त 50 लाखात संघात सामील
विशेष म्हणजे, कोलकाताने आयपीएल 2023च्या लिलावात गुरबाजला फक्त 50 लाख रुपयात संघात घेतले होते. गुरबाज हा त्या अफगाणी खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांना आयपीएलमध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. गुरबाजने अफगाणिस्तानसाठी 41 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 1019 धावा चोपत आपला ठसा उमटवला आहे.

कोलकाताचा डाव
कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स गमावत 179 धावा चोपल्या आहेत. या धावा करताना कोलकाताकडून गुरबाजने सर्वाधिक 81 धावा आणि आंद्रे रसेलने 34 धावा केल्या. इतर एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी याने 3 विकेट्स, जोशुआ लिटल आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. (cricketer rahmanullah gurbaz smashed 2 sixes in hardik pandya over kkr vs gt ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
KKR vs GT सामन्यात खास पराक्रम! ‘या’ 3 खेळाडूंनी ठोकले अनोखे शतक; तुम्हीही म्हणाल, ‘भारीच’
‘तो भारतासाठी सर्व क्रिकेट प्रकारात खेळू शकतो’, ‘या’ खेळाडूचे फॅन बनले शास्त्री गुरुजी; जाणून घ्याच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---