सोमवारी (दि. 1 मे) लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर पार पडलेला लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील आयपीएल 2023चा 43वा सामना अनेक गोष्टींमुळे लक्षात ठेवला जाईल. यातील सर्वात मोठे कारण म्हणजे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडण. त्यानंतर दुसरे कारण आहे, जे चाहत्यांच्या मनात नेहमी लक्षात राहील. खरं तर, या सामन्यादरम्यान लखनऊ संघाचा फिरकीपटू रवी बिश्नोई याने विराट कोहली याला तंबूचा रस्ता दाखवला होता. विराटने बिश्नोईच्या चेंडूवर पुढे येऊन शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटला लागलाच नाही. त्यानंतर यष्टीरक्षकाने त्याला यष्टीचीत बाद करत तंबूत पाठवले.
पंचांचा हात आणि रवी बिश्नोईचा गाल
आता गोलंदाज रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने विराट कोहली (Virat Kohli) याला बाद केले, तेव्हा जल्लोष करणे साहजिक होते. मात्र, झाले असे की, बिश्नोई वेदनेने विव्हळताना दिसला. यादरम्यानचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. बिश्नोई जेव्हा या विकेटचा जल्लोष केल्यानंतर पंचांकडे आपली टोपी घेण्यासाठी पोहोचला, तेव्हा पंचांचे लक्ष दुसरीकडे होते. त्यामुळे जेव्हा पंच पलटले, तेव्हा त्यांचा हात रवी बिश्नोईच्या गालावर लागला.
यावेळी असे वाटले की, जसे काही पंचांनी बिश्नोईला चापट मारली आहे. मात्र, हे चुकून घडले होते. त्यानंतर पंचांनी बिश्नोईची या प्रकाराबद्दल माफीही मागितली. अशात हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/cricbaaz21/status/1653077777518829568?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1653077777518829568%7Ctwgr%5E51a94260b963f52448e086a7261e52614a4b0c43%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ravi-bishnoi-left-in-pain-after-dismissing-virat-kohli-umpire-mistakenly-hits-lsg-spinner-on-his-face-ipl-2023-watch-6067395.html
रवी बिश्नोईची सामन्यातील कामगिरी
रवी बिश्नोई याने बेंगलोरविरुद्ध फायदेशीर गोलंदाजी केली. त्याने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना बेंगलोरच्या एकाही फलंदाजाला सीमारेषेच्या पलीकडे चेंडू मारू दिला नाही. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 21 धावा खर्च करत 2 मोठे विकेट्स नावावर केल्या. बिश्नोईने विराटला बाद करण्याव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल याचीही शिकार केली.
आतापर्यंत आयपीएल 2023मध्ये रवी बिश्नोई याने 9 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 22.33च्या सरासरीने 12 विकेट्स नावावर केल्या आहेत. (cricketer ravi bishnoi left in pain after dismissing virat kohli umpire mistakenly hits lsg spinner on his face see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलच्या दुखापतीवर संघ व्यवस्थापन कसा काढणार मार्ग? आरसीबीकडून हरल्यानंतर कृणाल पंड्याने दिली माहिती
‘विराटने गंभीरला त्याची जागा दाखवली’, LSG vs RCB सामन्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस