कसोटी क्रिकेट हा फक्त दोन संघात खेळला जात नाही, तर दोन्ही संघांच्या काही खेळाडूंमध्ये एक वेगळ्या प्रकारची लढाई पाहायला मिळते. अशीच काहीशी लढाई भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेत रवींद्र जडेजा आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात पाहायला मिळते. सध्या चालू कसोटीत जडेजाने स्मिथला एकदा-दोनदा नाही, तर तब्बल 3 वेळा तंबूत धाडले आहे. विशेष म्हणजे, कसोटीत स्मिथविरुद्ध त्याने एक पराक्रम गाजवला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू बनला आहे.
अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात स्टीव स्मिथ (Steve Smith) पुन्हा बाद झाला. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने स्मिथच्या दांड्या गुल केल्या. या मालिकेतील 6 डावात ही तिसरी वेळ होती, जेव्हा स्मिथ जडेजाची शिकार बनला. या सामन्यात स्मिथ 63.4 षटकात जडेजाच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. यावेळी स्मिथने 135 चेंडूंचा सामना करत 38 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 चौकारही मारले.
ICYMI – #TeamIndia's delightful breakthrough!@imjadeja breaks the partnership to get Steve Smith out 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/8DPghkx0DE#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/lJVW7uzi9h
— BCCI (@BCCI) March 9, 2023
चौथ्या कसोटीत स्मिथला तंबूत पाठवताच जडेजाच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथला आतापर्यंत 4 वेळा त्रिफळाचीत केले आहे. जगातील इतर कोणत्याही गोलंदाजाला स्मिथला 2 पेक्षा जास्त वेळा त्रिफळाचीत करता आले नाहीये. जडेजाव्यतिरिक्त जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, भुवनेश्वर कुमार आणि रंगना हेरथ यांनी प्रत्येकी 2 वेळा स्मिथला त्रिफळाचीत केले आहे. जडेजाने स्मिथला कसोटीत एकूण 7 वेळा बाद केले आहे. दुसरीकडे, स्मिथला जडेजाविरुद्ध फक्त एक षटकार मारता आला आहे.
स्टीव्ह स्मिथला कसोटीत सर्वाधिक वेळा त्रिफळाचीत करणारे गोलंदाज
4 वेळा – रवींद्र जडेजा*
2 वेळा- जेम्स अँडरसन
2 वेळा- स्टुअर्ट ब्रॉड
2 वेळा- भुवनेश्वर कुमार
2 वेळा- रंगना हेरथ
पहिल्या दिवसाचा आढावा
ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 4 विकेट्स गमावत 255 धावा चोपल्या आहेत. पहिल्या तीन सामन्यात धावा करण्यासाठी संघर्ष करणारा ऑस्ट्रेलिया संघ चौथ्या कसोटीत चांगल्या लयीत असल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा हा 251 चेंडूंचा सामना करत 104 धावांवर खेळत आहे. यावेळी त्याने 15 चौकारांचाही पाऊस पाडला आहे. (cricketer ravindra jadeja is 1st bowler to bowled out steve smith most times in test cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अहमदाबाद कसोटी वादात! खेळपट्टीमुळे माजले रणकंदन, ऑस्ट्रेलियन दिग्गजांचे गंभीर आरोप
कर्णधार म्हणून स्मिथ जेव्हाजेव्हा भारतात आला तेव्हा नडलाय, पाहा ही जबरदस्त आकडेवारी