सध्या देशभरात दिवाळी सण साजरा केला जात आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यानेही ही दिवाळी आपला आदर्श आणि भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्यासोबत साजरी केली. दोन्ही यष्टीरक्षक फलंदाज या खास क्षणी पारंपरिक पेहरावात दिसले. विशेष म्हणजे, यावेळी धोनीची पत्नी साक्षी धोनी हीदेखील उपस्थित होती. साक्षी यावेळी स्टायलिश क्रीम रंगाच्या सूटमध्ये दिसली होती. पंत धोनीच्या खूपच जवळ आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्त झाल्यानंतर तो अनेकदा धोनीसोबत दिसला आहे. यावेळी त्याने धोनीसोबत दिवाळी सण साजरा केला.
साक्षीची पोस्ट
साक्षी धोनी (Sakshi Dhoni) हिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर यादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिषभ पंत (Rishabh Pant), एमएस धोनी (MS Dhoni) आणि साक्षी यांच्याव्यतिरिक्त त्यांचे इतर मित्र आणि नातेवाईकही दिसत आहेत. या फोटोंवरून असे दिसते की, हे फोटो रांची येथील धोनीच्या घरामधील आहेत. हे फोटो शेअर करत साक्षीने खास कॅप्शनही दिले. तिने लिहिले की, “आमच्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!”
https://www.instagram.com/p/CzjfNwPK3nx/?g=5&img_index=1
या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. या पोस्टला आतापर्यंत 16 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 6 हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “आता असं वाटतंय, आनंदी दिवाळी पूर्ण झाली.” आणखी एकाने लिहिले की, “आमची दिवाळी आणखी चांगली बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद.”
MS Dhoni And Rishabh Pant Celebrating Diwali 😍🪔. #MSDhoni #RishabhPant pic.twitter.com/ZxaBxNm63v
— Aufridi Chumtya (@ShuhidAufridi) November 12, 2023
रिषभ पंत मैदानावर परतण्याची आशा
रिषभ पंत मागील वर्षा डिसेंबर 2022मध्ये कार अपघातात गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याला आपले गुडघे आणि घोट्याची सर्जरी करावी लागली होती. यानंतरपासून तो एनसीएमध्ये रिहॅब करत आहे. अपघातानंतर पंत क्रिकेटपासून दूर झाला आहे. त्यामुळे तो बऱ्याच मोठ्या स्पर्धांना मुकला. त्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि विश्वचषक स्पर्धांचा समावेश आहे. मात्र, पुढील वर्षी जानेवारीपर्यंत तो मैदानावर परतण्याची आशा आहे.
आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सशी जोडलेला माजी भारतीय खेळाडू सौरव गांगुलीने अलीकडेच सांगितले होते की, रिषभ पंत या आयपीएलमध्ये मैदानावर पुनरागमन करेल. तसेच, तो पुन्हा एकदा दिल्लीचे नेतृत्व करेल. पंत भारतीय संघासाठी विश्वचषकातील योजनांचा महत्त्वाचा भाग होता, पण त्याच्या कार अपघातानंतर भारताला योजनांमध्ये बदल करावा लागला.
विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघासाठी केएल राहुल यष्टीरक्षण करत आहे. राहुल शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याव्यतिरिक्त दुसऱ्या यष्टीरक्षकाचा पर्याय म्हणून संघात इशान किशनही उपलब्ध आहे. किशनला विश्वचषकातील दोन सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली होती. मात्र, त्याला या संधीचा फायदा घेता आला नव्हता. (cricketer rishabh pant celebrates diwali with former cricketer ms dhoni photos goes viral)
हेही वाचा-
गुरबाजने केलेली अहमदाबादच्या गरीब लोकांची मदत; पाहून शशी थरूरही म्हणाले, ‘हृदयासारखं तुझं करिअरही…’
पाकिस्तानी खेळाडूची राहुलविषयी ‘ही’ प्रतिक्रिया वाचून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान; म्हणाला, ‘जगातील…’