---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणणाऱ्या पंतची अपघाताच्या 2 महिन्यांनंतर मोठी प्रतिक्रिया; काय म्हणाला वाचाच

On: बुधवार, मार्च 1, 2023 4:14 PM
Rishabh-Pant
---Advertisement---

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटीत विश्वासू यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा भारतीय संघाचा भाग नाहीये. त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची आकडेवारी शानदार आहे. खरं तर, पंतचा 30 डिसेंबर, 2022 रोजी भल्या पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावर अपघात झाला होता. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. अशात त्याने अपघाताच्या दोन महिन्यांनंतर त्यादरम्यानची सर्व कहाणी सांगितली आहे. तसेच, भारतीय संघातील पुनरागमनावरही भाष्य केले आहे.

काय म्हणाला रिषभ पंत?
रिषभ पंत (Rishabh Pant) म्हणाला की, त्याला आता चांगले वाटत आहे. तसेच, तो बरा होत आहे. आशा आहे की, तो वैद्यकीय पथकाच्या पाठिंब्याने लवकरच फिट होईल. इतक्या भयंकर अपघातातून वाचणे कुणासाठीही सोपे नसते. अशात पंत म्हणाला की, “अपघातानंतर मला आयुष्य जगण्याचा एक दृष्टिकोन मिळाला आहे. आज मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. आम्ही मोठी स्वप्ने पूर्ण करण्याच्या मागे लागलो आहोत, परंतु आयुष्य छोट्या छोट्या आनंदाने सेलिब्रेट करण्यास विसरून जातो.”

‘छोटे-छोटे आनंद समजून घेतोय’
रिषभ पंत म्हणाला की, “अपघातानंतर स्वत: ब्रश करणे, उन्हात बसल्यानेही आनंद होतो. माझ्या आयुष्यात या घटनेनंतर खूप बदल झाला आहे. मी छोट्या गोष्टी समजू लागलो आहे आणि आज प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. माझ्यासाठी हे बोलणे कठीण आहे की, मी क्रिकेटला किती मिस करत आहे. कारण, माझे आयुष्य त्याच्या भोवतीच असते. मी त्या क्षणाची प्रतीक्षा करू शकत नाही, जेव्हा मी पुन्हा क्रिकेट खेळत असेल.”

https://www.instagram.com/p/Coe5CxcNl1e/?utm_source=ig_embed&ig_rid=0ec01a8c-c784-4eb8-9579-0511fefa090a

रिषभ पंत याने ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका, आयपीएल 2023बाबतही चर्चा केली. तो म्हणाला की, “मी नशीबवान आहे की, मला इतके चांगले चाहते मिळाले. त्यांच्या शुभेच्छांसाठी मी धन्यवाद देतो. मी चाहत्यांना हे सांगू इच्छितो की, तुम्ही भारतीय संघ आणि दिल्ली कॅपिटल्सला पाठिंबा द्यावा. मीदेखील लवकरच पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.”

भारतीय संघ आघाडीवर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील 2 सामने भारताने जिंकले असून तिसरा सामना इंदोर येथे सुरू आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव 109 धावांवर संपुष्टात आला. तसेच, फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या 41 षटकांनंतर 2 विकेट्स गमावत 121 इतकी आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोहलीने ज्यासाठी 107 कसोटी खेळल्या, ती कामगिरी उमेश यादवने 55 सामन्यात दाखवली करून
जेम्स अँडरसनची बादशाहत अश्विनकडून उद्ध्वस्त! बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---