मागील महिन्यात 24 जुलैपासून सुरू झालेली देवधर ट्रॉफी 2023 स्पर्धा 3 ऑगस्ट रोजी संपणार आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. तसेच, निवडकर्त्यांचे लक्षही आपल्याकडे वेधले आहे. या यादीत युवा फलंदाज रियान पराग याच्या नावाचाही समावेश आहे. या 21 वर्षीय फलंदाजाने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये वादळी फलंदाजी करत 4 सामन्यातच 259 धावांचा पाऊस पाडला आहे.
रियान परागमुळे संघाची धावसंख्या 300 पार
देवधर ट्रॉफी 2023 (Deodhar Trophy 2023) स्पर्धेतील 14वा सामना ईस्ट झोन विरुद्ध वेस्ट झोन (East Zone vs West Zone) संघात पाँडिचेरी येथे पार पडला. या सामन्यात ईस्ट झोन संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 319 धावा चोपल्या. ईस्ट झोन (East Zone) संघाकडून सर्वाधिक धावा रियान पराग (Riyan Parag) यानेच केल्या.
5 days. 3 games. 2 hundreds. 1 Riyan Parag! 🔥💗 pic.twitter.com/HkXYRWi1ro
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 2, 2023
रियान परागचे शतक, स्पर्धेत 259 धावा
रियान पराग याने यावेळी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 68 चेंडूत नाबाद 102 धावांची शतकी खेळी साकारली. या खेळीत 5 षटकार आणि 6 चौकारांचाही पाऊस पाडला. त्याच्या खेळीच्या जोरावर ईस्ट झोन संघाला 319 धावा करण्यात यश आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट झोन संघाचा डाव 34 षटकात 162 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना ईस्ट झोन संघाने 157 धावांनी जिंकला.
देवधर ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत रियान पराग याने 4 सामन्यात 2 शतकांच्या मदतीने 259 धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, रियानने यादरम्यान 12 चौकार आणि सर्वाधिक 18 षटकारही मारले आहेत. तसेच, गोलंदाजी करताना त्याने 4 सामन्यात 9 विकेट्सही घेतल्या आहेत.
स्पर्धेचा अंतिम सामना
देवधर ट्रॉफीचा अंतिम सामना साऊथ झोन विरुद्ध ईस्ट झोन (South Zone vs East Zone) संघात खेळला जात आहे. या सामन्यात साऊथ झोनने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला असून त्यांनी 13 षटकापर्यंत एकही विकेट न गमावता 100 धावसंख्या उभारली आहे. (cricketer riyan parag hit 259 runs in deodhar trophy)
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! क्रीडा मंत्री झालेल्या भारतीय खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
पाकिस्तान टॉपर असणाऱ्या ‘या’ विक्रमाच्या यादीत भारत पटकावणार दुसरा क्रमांक, बातमी लगेच वाचा