भारतीय संघ गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भिडणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील हा सामना भारतासाठी खास असणार आहे. कारण, भारतीय संघ या सामन्याद्वारे टी20 क्रिकेटमधील एक खास द्विशतक पूर्ण करणार आहे. यासह भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा जगातील दुसरा संघ बनेल. चला तर, भारताच्या या विक्रमाविषयी जाणून घेऊयात.
भारतीय संघ दुसऱ्या स्थानी
भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 200वा टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 2007 सालचा टी20 विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ असा पराक्रम करणारा जगातील दुसरा संघ बनेल. भारतापूर्वी फक्त पाकिस्तान संघाला ही कामगिरी करता आली आहे. पाकिस्तानने आतापर्यंत 223 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. तसेच, भारतीय संघ 199 सामन्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड संघ असून त्यांनी 193 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
या यादीत श्रीलंका संघ चौथ्या स्थानी आहे. तसेच, 2021चा टी20 विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया संघ पाचव्या स्थानी आहे. श्रीलंका संघाने 179, तर ऑस्ट्रेलियाने 174 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. खरं तर, सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला होता. हा सामना 17 फेब्रुवारी, 2005 रोजी आयोजित झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 44 धावांनी विजय मिळवला होता.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारे संघ
223 सामने- पाकिस्तान
199 सामने- भारत*
193 सामने- न्यूझीलंड
179 सामने- श्रीलंका
174 सामने- ऑस्ट्रेलिया
भारत-वेस्ट इंडिज पहिला टी20 सामना
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील पहिला टी20 सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर पार खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. (team india will be playing their 200th t20i match today and will become 2nd team read more)
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे बाप! वनडे कारकीर्दीतील नवव्या विकेटसाठी 10 वर्षे थांबला ‘हा’ गोलंदाज, पुनरागमन करताच काढली Wicket
आफ्रिदीच्या जावयाची इंग्लंडमध्ये हवा! डेब्यू सामन्यात पहिल्या दोन चेंडूवर चटकावल्या विकेट्स, Video