---Advertisement---

नऊ सामन्यात फक्त १२८ धावा करणाऱ्या विराटला काय सल्ला देशील? रियान परागच्या उत्तराने जिंकली सर्वांची मने

On: गुरूवार, एप्रिल 28, 2022 7:16 PM
Riyan-Parag-And-Virat-Kohli
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खूपच खराब फॉर्ममधून जात आहे. त्याने आयपीएल २०२२मध्ये खेळताना मागील ३ सामन्यात २ वेळा गोल्डन डक (शून्यावर बाद) झाला आहे. या हंगामात विराटने चाहत्यांना खूपच निराश केले आहे. मंगळवारी (दि. २६ एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या फलंदाजी क्रमात बदल करत त्याला सलामीला फलंदाजी करण्यासाठी पाठवले होते. यावेळी तो चक्क सलामीला उतरला होता. मात्र, या क्रमांकावर फलंदाजी करतानाही विराटला खास कामगिरी करता आली नाही. त्याच्या खराब प्रदर्शनामुळे तो चांगलाच चर्चेत असून त्याला आजी-माजी क्रिकेटपटू सल्ले देत आहेत. अशात युवा फलंदाज रियान परागने विराटबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

विराट कोहलीला सल्ला देण्याच्या प्रश्नावर रियान परागने जिंकले मन
खरं तर विराट कोहलीने (Virat Kohli) फक्त १६च्या सरासरीने फलंदाजी करताना या हंगामात ९ सामन्यात १२८ धावा केल्या आहेत. त्याच्या धावांचा आकडा पाहिला, तर तो आयपीएल २०२२मध्ये तो कारकीर्दीच्या सर्वात वाईट काळातून जात आहे. विराटने २ वेळा पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यासह अनेक मोठे क्रिकेट पंडित विराटला यावेळी क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा सल्ला देत आहेत.

अशातच एका क्रिकेट वेबसाईटने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर चाहत्यांना प्रश्न विचारला की, ते विराट कोहलीला काय सल्ला देतील? या प्रश्नावर चाहत्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. मात्र, राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू रियान परागने (Riyan Parag) दिलेल्या उत्तराने सर्वांचे मन जिंकले.

‘विराट कोहलीला त्याचे त्याचे काम करू द्या’
खरं तर मंगळवारी बेंगलोरविरुद्ध ५६ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या रियान परागमुळे राजस्थानने २९ धावांनी विजय मिळवला. या अष्टपैलू खेळीसाठी परागला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राजस्थानच्या या युवा फलंदाजाने विराटला सल्ला देण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना लिहिले की, “आपल्यापैकी कोणीही असं केलं नाही पाहिजे. त्यांना त्यांचे काम करू द्या.”

विराट कोहलीची आयपीएल कारकीर्द
विराट जरी या हंगामात खराब कामगिरी करत असला, तरीही आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. विराटने आतापर्यंत २१६ सामन्यातील २०८ डावात फलंदाजी करताना ३६.४३च्या सरासरीने ६४११ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतके आणि ४२ अर्धशतकेही झळकावली आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

Video: आयपीएलमध्ये प्रथमच फलंदाजी करत असलेल्या शशांकची घातक बॉलर फर्ग्युसनविरुद्ध षटकारांची हॅट्रिक

बिग ब्रेकिंग! इंग्लंडला मिळाला रुटचा वारसदार; बेन स्टोक्स बनला नवा कसोटी कर्णधार

दिल्लीचा सामना पाहून चिडलेला पाँटिंग, ३-४ रिमोटही तोडले होते, स्वत:च केलाय खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---