इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेला अष्टपैलू रियान पराग याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने देवधर ट्रॉफी 2023 स्पर्धेत ईस्ट झोन संघाकडून खेळताना बॅटमधून आग ओकली आहे. त्याने नॉर्थ झोन संघाच्या गोलंदाजांना घाम फोडत शानदार शतक झळकावले आहे. मागील काही काळापासून रियानला खराब फॉर्ममुळे टीकांचा सामना करावा लागला होता. मात्र, त्याने आता शतक ठोकत सर्व टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
देवधर ट्रॉफी 2023 (Deodhar Trophy 2023) स्पर्धेतील 7वा सामना नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन संघात खेळला गेला. या सामन्यात ईस्ट झोन संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ईस्ट झोनने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 337 धावांचा डोंगर उभारला. संघाच्या या धावसंख्येत रियान पराग (Riyan Parag) याचे मोलाचे योगदान राहिले. त्याने 102 चेंडूत 131 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 5 चौकार आणि तब्बल 11 चौकारांचा पाऊस पाडला.
A 100* off 84 balls when East Zone was 57/5. Brilliant from Riyan Parag. 🔥👏 pic.twitter.com/f3V1YQIUYF
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) July 28, 2023
अवघ्या 84 चेंडूत साकारले शतक
रियान या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्याने या सामन्यात विस्फोटक फलंदाजी करताना अवघ्या 84 चेंडूत शतक साकारले. यामध्ये 4 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. त्याने सहाव्या विकेटसाठी कुशाग्रसोबत मिळून 235 धावांची भागीदारी रचली होती. कुशाग्रने यावेळी 87 चेंडूत 98 धावा केल्या. त्याला शतकासाठी 2 धावा कमी पडल्या. कुशाग्रने यावेळी 4 षटकार आणि 8 चौकारांचा पाऊस पाडला होता.
HUNDRED FOR RIYAN PARAG!!!!
Hundred from just 84 balls with 4 fours & 8 sixes in Deodhar Trophy when East Zone was in big trouble with 57 for 5, what a knock. pic.twitter.com/4XbQUIdSLB
— Johns. (@CricCrazyJohns) July 28, 2023
संघाची वरची फळी फ्लॉप
रियान पराग याच्या संघाची म्हणजेच ईस्ट झोन संघाची वरची फळी पूर्णत: फ्लॉप ठरली होती. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन 10, उत्कर्ष सिंग 11, विराट सिंग 02, सुब्रांशू सेनापती 13 आणि कर्णधार सौरभ तिवारी 16 धावांवर तंबूत परतले होते. त्यानंतर रियानने वादळी फलंदाजी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. रियानच्या खेळीच्या जोरावर संघाने 50 षटकात 337 धावांची भली मोठी धावसंख्या उभारली. (cricketer riyan parag score 131 runs in deodhar trophy north zone vs east zone)
महत्त्वाच्या बातम्या-
हुश्श! आता स्टेडिअममध्ये ‘या’ गोष्टीसाठी प्रेक्षकांच्या खिशाला बसणार नाही फटका, बीसीसीआयने उचलेले मोठे पाऊल
एकच मारला, पण कच्चून मारला! छोटेखानी खेळीत सूर्याच्या गगनचुंबी षटकाराने वेधले सर्वांचे लक्ष, Video