भारतात यावर्षीच्या अखेरीस म्हणजेच 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान विश्वचषक 2023 स्पर्धा पार पडणार आहे. या विश्वचषकापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. गुरुवारी (दि. 28 जुलै) बीसीसीआयने दिल्ली येथे राज्य क्रिकेट बोर्डांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर सचिव जय शाह यांनी माध्यमांना विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान चाहत्यांना मोफत पाणी उपलब्ध करून देण्याच्या योजनेविषयी सांगितले.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा मागील महिन्यातच झाली होती. मात्र, आता अनेक सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निश्चित वेळापत्रकानुसार, स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) संघातील सामन्याने होईल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआयला वनडे विश्वचषकादरम्यान मोफत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोका-कोला कंपनीसोबत करार करायचा आहे. स्पर्धेदरम्यान स्टेडिअमच्या आत चाहत्यांना मोफत पाण्याच्या बॉटल उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त बीसीसीआयने राज्य क्रिकेट बोर्डांना त्यांच्या संबंधित क्रिकेट स्टेडिअममची हाऊसकीपिंग, शौचालय आणि स्वच्छतेविषयीदेखील चर्चा केली आहे.
बैठकीदरम्यान वनडे विश्वचषकासाठी खेळाच्या किंमतींवरही चर्चा करण्यात आली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात होणाऱ्या सामन्याची तारीख बदलण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. खरं तर, 15 ऑक्टोबर रोजी होणारा हा सामना भारतात साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्री सणाचा पहिला दिवस असेल. अशात सुरक्षेच्या कारणांमुळे सामना एक दिवस आधी 14 ऑक्टोबर रोजी आयोजित केल्या जाण्याचे वृत्त आहे. मात्र, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे की, स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. मात्र, ठिकाणात बदल होणार नाही.
एकूण 10 ठिकाणी खेळले जातील 48 सामने
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मागील महिन्यात वनडे विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली होती. स्पर्धेच्या सुरुवातीचा सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघात होईल. या स्पर्धेत एकूण 48 सामने असतील. हे सर्व सामने 10 ठिकाणी खेळले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एकच मारला, पण कच्चून मारला! छोटेखानी खेळीत सूर्याच्या गगनचुंबी षटकाराने वेधले सर्वांचे लक्ष, Video
सोपा विजय अन् विक्रमांचा पाऊस! पहिल्या वनडेत भारताने बांधली रेकॉर्ड्सची भिंत, एक नजर टाकाच






