इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा समावेश होतो. रोहितने आतापर्यंत पाच वेळा मुंबई इंडियन्स संघाला ट्रॉफी जिंकून दिली आहे, तर एमएस धोनी याने चार वेळा चेन्नई सुपर किंग्स संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. असे असले, तरीही सुनील गावसकर यांना वाटते की, रोहितला आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाचे श्रेय मिळत नाही. ते गुरुवारी (दि. 25 मे) म्हणाले की, रोहितला आयपीएलमध्ये नेतृत्वात कमी लेखले जाते आणि त्याला कर्णधारपदाचे तितके श्रेय मिळत नाही, जितके धोनीला मिळते.
काय म्हणाले गावसकर?
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सांगितले की, रोहित शर्मा याच्या मैदानातील चर्चांमुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या यशात जी भूमिका बजावली, त्याची चांगली चर्चा होते. तसेच, त्यांनी यावरही चर्चा केली की, भारतीय कर्णधाराने आयपीएल 2023 एलिमिनेटर (IPL 2023 Eliminator) सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाला पराभूत करण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
माध्यमांशी बोलताना गावसकर म्हणाले की, कशाप्रकारे रोहितने आकाश मधवाल याचा आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांना एकाच षटकात बाद करण्यासाठी वापर केला. कर्णधाराने त्यांना अँगल बदलण्याचा सल्ला दिला, पण यावर खूप जास्त चर्चा झाली नाही.
ते म्हणाले की, “रोहित शर्मा की लेखला गेलेला कर्णधार आहे. त्याने मुंबईसाठी पाच किताब जिंकले आहेत. रोहितने आयुष बदोनीला बाद करण्यासाठी आकाश मधवालला षटक देऊन विकेट्स घेणारी गोलंदाजी करवून घेतली. त्यानंतर फलंदाज निकोलस पूरनसाठी त्याने राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यास सांगितले. जर रोहितच्या जागी धोनीने असे केले असते, तर प्रत्येकजण म्हणाला असता की, पूरनला बाद करण्यासाठी त्याने जबरदस्त रणनीती बनवली होती. मात्र, रोहितबाबत अशा गोष्टी केल्या जात नाहीत.”
गावसकरांनी यावेळी मुंबई इंडियन्स संघाचेही कौतुक केले. ते म्हणाले की, आयपीएल 2023 (IPL 2023)मध्ये खराब सुरुवात करूनही मुंबई संघाने प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी सुरुवातीच्या सात सामन्यांपैकी 4 सामने गमावले. त्यावेळी मुंबई संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत खूपच मागे होता. मात्र, पुढील सात सामन्यातील पाच सामने जिंकून त्यांनी प्ले-ऑफमधील स्थान पक्के केले.
एलिमिनेटर सामन्यात दणदणीत विजय
बुधवारी (दि. 24 मे) मुंबईने चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला 81 धावांनी पराभूत केले. मुंबईने या सामन्यात लखनऊला 183 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, या सामन्यात लखनऊ संघ 101 धावांवरच ढेपाळला. या विजयात आकाश मधवाल (Akash Madhwal) याने सिंहाचा वाटा उचलला. त्याने 3.3 षटके गोलंदाजी करताना 5 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या होत्या. (cricketer rohit sharma is underrated captain in ipl says sunil gavaskar compared with ms dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक Video : जीवापेक्षा तिकीट महत्त्वाचं? GTvsMI सामन्याच्या तिकिटासाठी स्टेडिअमबाहेर चेंगराचेंगरी
WTC फायनलची बक्षीस रक्कम पाहून तुम्हीच हसाल, IPLसमोर ‘अतिसामान्य’, पाहा रक्कम