लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ बुधवारी (24 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर समोरासमोर आले. मुंबईने या सामन्यात लखनऊ संघाला अक्षरशः चारीमुंड्या चीत करत 81 धावांनी मोठा विजय मिळवला. आता क्वालिफायर दोनमध्ये त्यांचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होईल. या सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले.
आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी बोलताना मुंबई इंडियन्स कशाप्रकारे युवा खेळाडूंना मोठे खेळाडू बनवते याचा खुलासा त्याने केला. तो म्हणाला,
“आताच्या नेहल वढेरा, तिलक वर्मा या खेळाडूंची कहाणी अगदी हार्दिक पंड्या जसप्रीत बुमराह यांच्यासारखीच आहे. पुढील दोन वर्षात हे दोघे मुंबई इंडियन्स व भारतीय संघासाठी मोठी कामगिरी करताना दिसू शकतात. मुंबई इंडियन्स संघ नेहमीच युवा खेळाडूंना तयार करत सुपरस्टार बनवत आलाय. यामध्ये आमच्या स्काऊट टीमचा खूप मोठा वाटा आहे.”
मागील वर्षी मुंबई इंडियन्ससाठी तिलक वर्मा याने चमकदार कामगिरी केली होती. या वर्षी त्याने आपल्या या कामगिरीत सातत्य ठेवले. त्यासोबतच फिनिशर म्हणून नेहल वढेरा व वेगवान गोलंदाज म्हणून आकाश मधवाल यांनी यांनी संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
रोहितने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात त्यावेळी डेक्कन चार्जर्स नावाने खेळणाऱ्या हैदराबादस्थित फ्रॅंचाईजीसह केलेली. त्यावेळीची आठवण सांगताना रोहित म्हणाला, “डेक्कन चार्जर्सने अगदी कमी वयात माझ्यावर विश्वास दाखवत उपकर्णधारपदाची जबाबदारी दिलेली.” तसेच, 2011 वनडे विश्वचषकासाठी आपली निवड झाली नाही. हे माझ्यासाठी धक्कादायक होते असे तो म्हणाला.
(Rohit Sharma Said Nehal Wadhera Tilak Varma Will Become Stars Like Hardik Pandya And Jasprit Bumrah)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईसीबीच्या करारातून मुक्त होणार इंग्लंडचा दिग्गज फलंदाज? लीग क्रिकेट खेळण्यासाठी 30 कोटींची ऑफर