भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आशिया चषक 2023 स्पर्धेत इतिहास घडवला आहे. रोहितने त्याला ‘हिटमॅन’ का म्हणतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. रोहित शर्मा आशिया चषकात सर्वाधिक षटकार मारणारा अव्वल भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या नावावर होता.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील पाचवा सामना भारत विरुद्ध नेपाळ (India vs Nepal) संघात पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम येथे खेळला गेला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, पण भारतीय संघाने हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 10 विकेट्सने आपल्या खिशात घातला. याच सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची बॅट चांगलीच तळपली. त्याने डावाची सुरुवात करत 59 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने 125.42च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक नाबाद 74 धावांचा पाऊस पाडला. यासह त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
रोहित शर्माचा विक्रम
रोहित शर्मा भारतासाठी आशिया चषकात सर्वाधिक षटकार मारणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला. ‘हिटमॅन’ रोहितने भारतासाठी आशिया चषकात 2008पासून आतापर्यंत एकूण 24 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 23 डावात 22 षटकार निघाले आहेत. याव्यतिरिक्त त्याने 67 चौकारांचाही पाऊस पडला आहे.
रोहित शर्मा याच्यापूर्वी हा खास विक्रम माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याच्या नावावर होता. रैनाने भारतीय संघासाठी 2008 ते 2012 यादरम्यान एकूण 13 सामने खेळले. त्याने यादरम्यान 13 डावांमध्ये एकूण 18 षटकार मारले होते.
आशिया चषकात सर्वाधिक षटकार कुणाचे?
आशिया चषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या नावावर आहे. आफ्रिदीने 1997 ते 2014 यादरम्यान 23 सामने खेळले. यादरम्यान त्याने 21 डावात 26 षटकारांची बरसात केली होती. या यादीत दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याचे नाव येते. जयसूर्याने आशिया चषकात 1990 ते 2008 दरम्यान एकूण 25 सामने खेळले होता. यामध्ये त्याच्या बॅटमधून 24 डावात 23 षटकार निघाले होते.
भारताकडून कुणी किती षटकार मारले?
भारतासाठी आशिया चषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या अव्वल 5 फलंदाजांमध्ये रोहित शर्मा (22), सुरेश रैना (18), सौरव गांगुली (13), वीरेंद्र सेहवाग (12) आणि एमएस धोनी (12) यांचा समावेश आहे. धोनीने आशिया चषकात सर्वाधिक सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याचे नाव यादीत पाचव्या स्थानी आहे. (cricketer rohit sharma left behind suresh raina became the 1st indian batsman to hit most sixes in asia cup)
महत्त्वाच्या बातम्या-
Asia Cup 2023मधून मोठी बातमी! Super- 4 फेरीतील सामन्यांबद्दल घेतला ‘हा’ निर्णय, INDvPAK सामना होणार फिक्स
नेपाळविरुद्ध 10 विकेट्सने विजय, तरीही रोहित नाखुश; म्हणाला, ‘अशाने आम्ही विश्वचषकच काय आशिया चषकही…’