---Advertisement---

ऋतुराजच्या षटकारामुळे महागड्या गाडीवर पडला डेंट, आता मिळणार 5 लाख रुपये; कारण घ्या जाणून

On: मंगळवार, एप्रिल 4, 2023 12:11 PM
Ruturaj-Gaikwad
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स संघाने सोमवारी (दि. 3 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला 12 धावांनी पराभूत केले. तसेच, हंगामातील पहिला विजय नावावर केला. लखनऊ संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या विजयाचे हिरो ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली ठरले. ऋतुराजने वादळी 31 चेंडूत 57 धावा केल्या. त्यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान ऋतुराजने मारलेल्या एका षटकारामुळे थेट चांदी झाली. चला सविस्तर जाणून घेऊयात…

ऋतुराजचा षटकारामुळे लाखोंच्या गाडीवर पडला डेंट
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने त्याच्या विस्फोटक खेळीदरम्यान खतरनाक षटकार मारला. हा षटकार थेट लाखो रुपयांच्या गाडीवर जाऊन लागला. त्यामुळे गाडीवर डेंट पडला. झाले असे की, सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाच्या डावातील पाचव्या षटकात ऋतुराजने लखनऊ सुपर जायंट्स संघाचा गोलंदाज कृष्णप्पा गौथम याच्या चेंडूवर जोरदार षटकार मारला. हा षटकार थेट मैदानाबाहेर उभ्या केलेल्या टाटा कंपनीच्या गाडीवर जाऊन लागला. यादरम्यानचा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.

https://twitter.com/LokeshS30714400/status/1642903366329303040?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1642903366329303040%7Ctwgr%5Ec9015c30d4294e3ea9242b5dd0022bfa47850b8a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fipl%2Fipl-2023-ruturaj-gaikwad-powerful-six-shot-dents-sponsor-tata-car-csk-vs-lsg-match-5-lakh-donation-poor-people%2F1638464

कोणाला मिळणार 5 लाख रुपये?
अशात आता टाटा टियागो ईव्ही चेंडू लागल्यामुळे 5 लाख रुपये गरिबांमध्ये दान करणार आहे. नियमानुसार, जर चेंडू थेट जाऊन गाडीला लागला, तर 5 लाख रुपये गरिबांना दान केले जातील. या रकमेचा वापर कर्नाटकच्या कॉफीच्या लागवडीची जैवविविधता वाढवण्यासाठी केला जाईल.

सामन्याचा आढावा
चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर रंगलेल्या स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांच्यात शतकी भागीदारी झाली. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर चेन्नईने 217 धावांचा पाऊस पाडला. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला काईल मेयर्सच्या 53 धावांच्या जोरावर 205 धावाच करता आल्या. यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना मोईन अली याने 26 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. तसेच, तुषार देशपांडे याने 2 विकेट्स घेतल्या.

विशेष म्हणजे, यापूर्वी ऋतुराजने 92 धावांची वादळी खेळी साकारली होती. मात्र, या सामन्यात चेन्नईला गुजरातकडून 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. (cricketer ruturaj gaikwad powerful six vs lsg shot dents sponsor tata car 5 lakh donation poor people)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! भारताला 28 वर्षांनी चॅम्पियन बनवणाऱ्या धोनीचा विजयी षटकार होणार ‘अमर’, एमसीएचा मोठा निर्णय
‘विरोधी संघाचे फलंदाजच चांगले…’, पराभवानंतर राहुलने ‘या’ खेळाडूंवर फोडले पराभवाचे खापर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---