---Advertisement---

सचिनच्या मुलीला मिळाली तिची हुबेहूब कॉपी; व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘आणखी पाच शोधायची गरज’

On: मंगळवार, डिसेंबर 6, 2022 7:47 PM
Sara-Tendulkar
---Advertisement---

सोशल मीडियावर सामान्य व्यक्तींपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण सक्रिय असतात. यावर ते त्यांच्या वैयक्तित आणि व्यावसायिक आयुष्याविषयी माहिती देत असतात. या सेलिब्रिटींमध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिचाही समावेश होतो. साराचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या भरमसाठी प्रतिक्रिया येत असतात. अशात नुकताच तिने सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.

हुबेहूब सारा तेंडुलकरची कॉपी
खरं तर, ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने सांगितले आहे की, हुबेहूब सारा तेंडुलकरची कॉपी मिळाली आहे.

साराची इंस्टाग्राम स्टोरी
सारा तेंडुलकर नुकतीच थायलंड आणि बुडापेस्ट येथे फिरताना दिसली. यादरम्यान तिने 4 डिसेंबर रोजी तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये तिने कॅनडाची राहणारी एंड्रिया हिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, व्हिडिओत ती बर्फाचा आनंद लुटताना हुबेहूब सारा तेंडुलकरची कॉपी (Sara Tendulkar Doppelganger) दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत साराने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आता फक्त आणखी 5 जणींना शोधायची गरज आहे.”

Sara-Tendulkar
Photo Courtesy: Instagram/saratendulkar

https://www.instagram.com/reel/ClMX8-mJ2V-/?utm_source=ig_web_copy_link

सारा तेंडुलकर ही जरी अभिनयक्षेत्रात नसली, तरीही ती मॉडेलिंग करताना दिसते. तिने अनेक जाहिरातींची शूटिंगही केली आहे. सारा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत असते. पाच दिवसांपूर्वीच तिने इंडोनेशियातील आपले फोटो शेअर केले होते.

https://www.instagram.com/p/Clla-UyNy31/?utm_source=ig_embed&ig_rid=1af08b4b-204e-4fa6-a4bc-3a7601a5b1d0

साराला इंस्टाग्रामवर 2.4 मिलियन म्हणजेच जवळपास 24 लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स मिळतात. (Cricketer sachin tendulkar daughter sara find her doppelganger in canada watch video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेम्स अँडरसनकडून अनिल कुंबळेंना धक्का! दिग्गजाने रावलपिंडी कसोटीत रचला इतिहास
चित्तथरारक! कैफने 10 हजार फुटांच्या उंचीवरून मारली डाईव्ह, पाहून तुमचेही फिरतील डोळे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---