fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कोरोनामुळे ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या वडीलांचे निधन, सेहवागने मागितली होती मदत

मुंबई । भारतीय क्रिकेटर सिद्धांत डोबाल यांचे वडील माजी क्रिकेटर संजय डोबाल यांचे सोमवारी निधन झाले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. संजय हे दिल्लीमध्ये क्लब क्रिकेटर होते. दिल्लीच्या 23 वर्षाखालील संघाचे सपोर्ट स्टाफ होते. 

रविवारच्या दिवशी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने सोशल मीडियावर त्यांना मदत करण्याचे अवाहन केले होते. दिल्लीच्या या माजी अष्टपैलू खेळाडूंचे निधन झाल्याने क्रिकेट जगतात मोठा धक्का बसला आहे. डोबाल यांच्या परिवारात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. सिद्धांत राजस्थानच्या संघाकडून खेळतो तर छोटा मुलगा एकांश दिल्लीच्या 23 वर्षाखालील संघाकडून क्रिकेट खेळतो.

डीडीसीएचा एक अधिकारी याबाबत माहिती देताना म्हणाले की, डोबाल यांना कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून येत होते. त्यांच्यावर बहादुरगड येथील उपचार सुरू होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर द्वारका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्लाज्मा थेरेपीचे उपचार दाखल करण्यात आले. मात्र त्याचा कोणताच फायदा झाला नाही.

गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि मिथुन मन्हास यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्लाझ्मा डोनेट करण्यासंदर्भात अपील देखील केली होती. डोबाल यांनी एअर इंडियाकडून क्रिकेट खेळल्यानंतर ज्युनिअर क्रिकेटरला कोचिंग देण्यास सुरुवात केली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सीके खन्ना, दिल्लीचे दिग्गज खेळाडू मदन लाल आणि मिथून मन्हास यांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

दिल्लीचे काही क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, मिथून मन्हास यांच्यात डोबाल खूप प्रसिद्ध होते. ते सोनेट क्लबकडून क्रिकेट खेळले होते.

You might also like