---Advertisement---

कश्मीरच्या रोमानाच्या प्रेमात सरफराज क्लीन बोल्ड! लग्नासाठी मिळाली बहिणीची मदत

On: सोमवार, ऑगस्ट 7, 2023 12:21 PM
SARFARAZ KHAN
---Advertisement---

भारताचा देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार खेळाडू सरफराज खान आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. सरफराजने 6 ऑगस्ट रोजी रोमाना जहूर हिच्यासोबत लग्न केले. रोमाना कश्मीरच्या शोफिया जिल्ह्यातील राहणारी आहे. सरफराजने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून चाहत्यांना लग्नाबाबत माहिती दिली.

सरफराज खान () देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागच्या काही वर्षांपासून सतत चर्चेतील नाव आहे. सरफराजने रनजी ट्रॉफीच्या मागच्या दोन-तीन हंगामांमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. असे असले तरी, भारतीय संघात त्याला अद्याप संधी मिळाली नाहीये. माध्यमांतील वृत्तांनुसार सरफराज आणि रोमाना यांची पहिली भेट दिल्लीमध्ये झालीहोती. पहिल्याच भेटीत दोघांना एकमेकांवर प्रेम झाले होते. त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सरफराजच्या घरच्यांकडून रोमानाच्या घरी लग्नाची मागनी घातली गेली होती.

दिल्लीमध्ये रोमाना ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती, त्याचठिकाणी सरफराजची बहीण देखील शिक्षण घेत होती. सरफराजच्या बहिणीमुळेच दोघांची ओळख झाली आणि पुठे प्रेम देखील झाले. सरफराजने आपल्या बहिणीला याबाबत सांगितल्यानंतर दोघांच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू झाले. सरफराजने केलेल्या लग्नाच्या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सरफराजच्या कारकिर्दीचा विचार केला, तर मागच्या दोन वर्षांमध्ये त्याने देशांर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर तो मागेच भारतासाठी पदार्पण करणे चाहत्यांना अपेक्षित होते. पण अध्याप सते होऊ शकले नाही. अशात अनेकदा भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यावर टीका होताना दिसली. यावर्षी इंडियन प्रीमियर लीगचा 16वा हंगाम भारतात खेळला गेला. सरफराज यावेळी दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला, पण त्यायची बॅट शांत होती. सध्या तो खराब फॉर्ममध्ये आहे. पण चाहत्यांना आगामी काळात सरफराजला भारतासाठी खेळताना पाहायचे आहे. यासाठी सरफराजला लवकरात लवकर फॉर्ममध्ये परतावे लागणार, हे मात्र निश्चित.  (Cricketer Sarfraz Khan married Romana Zahoor from Kashmir)

महत्वाच्या बातम्या –
BREAKING! स्टार खेळाडूचा पत्ता टक, विश्वचषकासाठी 18 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघ घोषित
संजू पुन्हा फ्लॉप! दुसऱ्या टी20 मध्येही अपेक्षांवर फेरले पाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---