भारतीय संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज शिखर धवन सध्या संघातून बाहेर आहे. धवनने नुकतीच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धवनने सांगितले आहे की, कोणत्या गोष्टी आहेत, ज्या एमएस धोनीला इतर कर्णधारांपेक्षा वेगळे बनवतात. धवननुसार धोनीकडे ज्याप्रकारची कला आहे, ती कोणत्याच खेळाडूकडे नाहीये.
शिखर धवन (Shikhar Dhawan) हा मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये भारताचा सलामी फलंदाज होता. वनडे आणि टी20त तो रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत डावाची सुरुवात करायचा. त्याव्यतिरिक्त आयसीसी स्पर्धांमधील त्याची आकडेवारी कौतुकास्पद राहिली आहे. मात्र, सातत्य नसल्यामुळे तो संघाबाहेर झाला आणि आता त्याच्या जागी शुबमन गिल आणि ईशान किशन हे युवा फलंदाज भारतासाठी डावाची सुरुवात करताना दिसतात.
‘एमएस धोनीकडे वेगळ्या प्रकारची कला आहे’
शिखर धवन हा एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. 2013मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यात शिखर धवन याचा मोलाचा वाटा होता. माध्यमांशी बोलताना त्याला धोनीबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा तो म्हणाला की, “धोनी भाईची उपस्थिती खूप मजबूत आहे. प्रत्येक गोष्ट चांगल्या परफॉर्मन्सनेच व्हावी हे गरजेचे नाही. त्याच्याकडे जो अनुभव आहे आणि ज्याप्रकारच्या तो हालचाली करतो, ते शानदार असतात. ज्याप्रकारे दबावातील परिस्थितीत त्याच्याकडे जी स्थिरता असते आणि तो विचारपूर्वी निर्णय घेतो, ते प्रशंसनीय आहे. त्यामुळेच तो इतका यशस्वी कर्णधार आहे.”
खरं तर, एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीच्या तीन ट्रॉफी नावावर केल्या आहेत. तसेच, संघाला कसोटीतही अव्वल बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. याव्यतिरिक्त धोनीने आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्स संघाला 4 वेळा चॅम्पियन बनवले आहे. आता पाचव्या विजेतेपदासाठी तो 31 मार्चपासून आयपीएल 2023मध्ये खेळताना दिसणार आहे. (cricketer shikhar dhawan reacts on ms dhoni leadership qualities)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारत खूपच खराब क्रिकेट खेळला, वर्ल्डकपसाठी तयारही नाही’, पाकिस्तानी खेळाडूने ओकली गरळ
अखेर घटस्फोटावर शिखरने सोडले मौन! म्हणाला, “व्यक्ती ओळखण्यात चूक झाली”