क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंमध्ये अनेकदा वाद होताना दिसतात. असाच एक वाद आयपीएल 2023च्या 66व्या सामन्यात पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स संघाच्या दोन खेळाडूंमध्ये झाला. या सामन्यात राजस्थान संघाने 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला. यासह राजस्थानने 14 सामन्यात 14 गुण मिळवत गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले. आता राजस्थानला इतर संघांच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. अशात आता सॅम करन आणि शिमरॉन हेटमायर यांच्यात झालेले भांडण सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. चला तर त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
पंजाब किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्स गमावत 187 धावा केल्या होत्या. पंजाबच्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयसवाल (36 चेंडूत 50 धावा), देवदत्त पडिक्कल (30 चेंडूत 51 धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 49 चेंडूत 79 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याने राजस्थानची धुरा सांभाळली.
हेटमायर आणि करनमध्ये पंगा
धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन आणि शिमरॉन हेटमायर (Sam Curran And Shimron Hetmyer) यांच्यात वाद झाला. 17व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हेटमायर याच्याविरुद्ध अपील करण्यात आली. तसेच, त्याला पंचांनी बाद दिले. यावेळी सॅम करन हेटमायरकडे जाऊन जल्लोष करू लागला आणि काहीतरी बोलला. मात्र, हेटमायरने डीआरएस घेतला आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय त्याच्या बाजूने लागला. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. षटक संपल्यानंतरही करन आणि हेटमायरमध्ये बाचाबाची सुरूच होती.
पुन्हा 19व्या षटकात आमने-सामने
सॅम करन 19वे षटक टाकण्यास आला, तेव्हा हेटमायरने त्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारा. यावेळी तो चौकाराच्या पोझमध्येच बॅट घेऊन धावत नॉन-स्ट्रायकर एंडपर्यंत गेला. मात्र, यावेळी करनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या षटकात हेटमायरने आणखी एक चौकार मारला, पण पाचव्या चेंडूवर करनला त्याची विकेट घेण्यात यश आले.
Hetmyer × Sam Curran 🤜🤛🔥
Intensity × Aggression🥵💥 pic.twitter.com/WpBcZMmYv8— Mani Dhoni (@manidhonii) May 19, 2023
नेमकं काय झालं?
सामन्यानंतर जेव्हा हेटमायर मुलाखत देण्यासाठी आला, तेव्हा त्याला विचारण्यात आले की, करन त्याला काय म्हणाला होता? यावर हेटमायरने हसत हसत म्हटले की, “मी इथे काहीही सांगू शकत नाही. हे नेहमी चांगले असते की, जेव्हा कोणी मला काही बोलते. आज जास्त काही झाले नाही. मला आज फलंदाजी करण्यात मजा आली, ज्यामुळे मला आणखी आत्मविश्वास मिळाला.”
https://twitter.com/mufaddalVohra_/status/1659620619145838592?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1659620619145838592%7Ctwgr%5E3a9180f108662fccc210174450ffa6976e51440a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fiplt20%2Fnews%2Fshimron-hetmyer-and-sam-curran-verbal-fight-ipl-2023-pbks-vs-rr%2Farticleshow%2F100367736.cms
हेटमायरने या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 28 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. त्याने या धावा करताना 3 षटकार आणि 4 चौकारांचाही पाऊस पाडला. त्यानेही राजस्थानच्या या विजयात मोलाचा वाटा उचलला. (cricketer shimron hetmyer and sam curran verbal fight ipl 2023 pbks vs rr)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज कर्णधाराचे निधन, क्रिकेटविश्वावर दु:खाचा डोंगर
दिल्लीविरुद्ध भिडण्यापूर्वी धोनीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! चेन्नईचा कोचच म्हणाला, ‘तो 100 टक्के…’