मागील काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. यानंतर आता पुन्हा एकदा या जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. शोएब मलिकने इंस्टाग्राम बायो बदलले, त्यामुळे या चर्चा होत आहेत. या जोडप्याचे लग्न 12 एप्रिल, 2010 रोजी झाले होते. त्यांना इजहान नावाचा मुलगाही आहे. त्याचा जन्म 30 ऑक्टोबर, 2018 रोजी झाला होता. मात्र, आता त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.
शोएब मलिकने इंस्टाग्राम बायो बदलले
शोएब मलिक (Shoaib Malik) याने त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये मोठा बदल केला आहे. तसेच, नेहमीच इतरांच्या आयुष्यात लक्ष घालणाऱ्या चाहत्यांनी हा बदल लगेच ओळखला. आता शोएबच्या इंस्टाग्राममधील बदल दाखवण्यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत. खरं तर, शोएबने आधी त्याच्या इंस्टा बायोमध्ये स्वत:ला एका सुपरवुमनचा पती म्हटले होते. याद्वारे तो सानिया मिर्झा (Sania Mirza) हिच्याविषयी सांगत होता. मात्र, आता त्याने बदल करत फक्त “वडील होणे हे खरे वरदान आहे,” असे लिहिले आहे.
https://twitter.com/OyeShaani/status/1687033917138677765
यानंतर आता शोएब मलिक आणि सानिया मिर्झा (Shoaib Malik And Sania Mirza) यांच्या घटस्फोटाच्या बातम्या पुन्हा व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला होता. यानंतर दोघांनी पाकिस्तानच्या ओटीटी प्लॅटफॉर्म उर्दूफ्लिक्सवर ‘द मिर्झा और मलिक शो’ होस्ट केला होता.
Shoaib Malik Confirms Divorce With Sania Mirza after he removed Sania Mirza from his Official Instagram Bio 💔 pic.twitter.com/RIIbvFvM07
— Namal (@NamalAfandi) August 3, 2023
शोएबच्या अफेअरच्या चर्चा
पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर (Ayesha Omar) हिने शोएब मलिकसोबत एक फोटोशूट केले होते. यानंतर दोघांच्या अफेअरच्या अफवा पसरू लागल्या होत्या. काही लोकांनी असेही म्हटले की, आयेशा ओमरसोबत शोएबच्या वाढत्या जवळीकतेमुळे त्याच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम झाला. मात्र, आयेशाने या बातम्या फेटाळल्या होत्या. ती म्हणाली होती की, ती कधीही विवाहित पुरुषासोबत नात्याचा विचारही करू शकत नाही. (cricketer shoaib malik changed his instagram profile rumours of divorce with sania mirza read here)
महत्त्वाच्या बातम्या-
देवधर ट्रॉफीत रियान पराग नावाचं वादळ! 259 धावा चोपत घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स
बिग ब्रेकिंग! क्रीडा मंत्री झालेल्या भारतीय खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती