---Advertisement---

हार्दिक पंड्याचे कर्णधारपद धोक्यात! ‘या’ वादळी फलंदाजाने ठोकला दावा

On: गुरूवार, मार्च 23, 2023 7:35 PM
Gujarat-Titans-Team
---Advertisement---

जगभरातील क्रिकेटप्रेमी एका गोष्टीची खूपच प्रतीक्षा करत आहेत. त्यातल्या त्यात भारतातील क्रिकेटप्रेमींची त्या गोष्टीविषयीची उत्सुकता  कित्येक पटींनी ताणली गेली आहे. ती गोष्ट म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग होय. आयपीएल 2023 स्पर्धेला आठवडाभरात सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांनी भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्यामुळे गिल सध्या जोरदार चर्चेत आहे.

काय म्हणाले विक्रम सोलंकी?
विक्रम सोलंकी (Vikram Solanki) यांचा विश्वास आहे की, शुबमन गिल (Shubman Gill) याला क्रिकेटची चांगली जाण आहे. तसेच, तो भविष्यात या फ्रँचायझी संघाचा कर्णधारही बनू शकतो. गुरुवारी (दि. 23 मार्च) माध्यमांशी बोलताना म्हटले की, “शुबमनमध्ये एक नेतृत्वगुण लपले आहे. तो बरीच जबाबदारी घेतो. माझ्या मते, हे महत्त्वाचे नाही की, तुमच्या समोर कर्णधार असल्याचे चिन्ह असल्यावरच तुम्ही तुमची भूमिका निभावता. शुबमनने मागील वर्षी त्याच्या आचरणात आणि खेळाप्रती आपल्या वर्तणुकीमुळे नेतृत्वाची भूमिका साकारली होती.”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “शुबमन भविष्यात कर्णधार असेल, असा विचार मी करतो? तर हो निश्चितरीत्या. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्याच्या नेतृत्वगुण आहे, तो परिपक्व आहे आणि त्याच्या प्रतिभादेखील आहे. त्याच्याकडे क्रिकेटचे चांगले ज्ञान आहे. आम्ही शुबमनशी चर्चा करत राहू आणि जो निर्णय घेतला जाईल, त्यात त्याचे मत नक्की विचारले जाईल.”

गिलची कामगिरी
शुबमन गिल मागील सहा महिन्यांपासून भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. यादरम्यान त्याने अफलातून कामगिरीदेखील केली आहे. यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत द्विशतक ठोकण्याचाही समावेश आहे. त्याने मागील वर्षी गुजरात टायटन्सला आयपीएल खिताब जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. हार्दिक पंड्या याचे सलग दुसऱ्या हंगामात गुजरातचे नेतृत्व करणे निश्चित आहे, परंतु संघ व्यवस्थापन गिलला भविष्यातील कर्णधाराच्या रूपात पाहते.

आयपीएल सामना गुजरात आणि चेन्नईमध्ये
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ 31 मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाविरुद्ध खेळणार आहे. (cricketer shubman gill can be future leader for gujarat titans vikram solanki)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांचा भीमपराक्रम! वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी
किती आले किती गेले! टीम इंडियाला 4 वर्षापासून सतावतोय 4 नंबरचा प्रश्न, चाचपले इतके पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---