भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आता भारतीय संघाचा नवीन ‘रनमशीन’ बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. गिलने सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत धावांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. आधी द्विशतक आणि आता आणखी एक शतकी खेळी करत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. अशात स्पष्ट होते की, यावर्षीच्या वनडे विश्वचषकापूर्वीच शुबमन गिल हा आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज सिद्ध झाला आहे.
मंगळवारी (दि. 24 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी शुबमन गिल (Shubman Gill) याने सलामीला फलंदाजी करताना शतक झळकावले. हे त्याच्या कारकीर्दीतील चौथे शतक ठरले. त्याने तिसऱ्या वनडेत फक्त 78 चेंडूत 112 धावांची खेळी साकारली. या धावा करताना त्याने 5 षटकार आणि 13 चौकारांचा पाऊस पाडला. गिल याच्या बॅटमधून यावेळी 143.58च्या सरासरीने धावा निघाल्या.
CENTURY number 4️⃣ in ODI cricket for @ShubmanGill!
The #TeamIndia opener is in supreme form with the bat 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/ojTz5RqWZf…#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/OhUp42xhIH
— BCCI (@BCCI) January 24, 2023
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शुबमन गिलची कामगिरी
शुबमन गिल याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात तब्बल 208 धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर दुसऱ्या वनडेत त्याला फार मोठी खेळी साकारता आली नाही. तो दुसऱ्या वनडेत नाबाद 40 धावा करू शकला. यानंतर आता तिसऱ्या वनडेत गिलने 112 धावा कुटल्या.
अशाप्रकारे शुबमन गिल याने या मालिकेत एकूण 3 सामन्यांच्या 3 डावात एकूण 360 धावा चोपल्या. या धावा करताना त्याची सरासरी ही तब्बल 180 इतकी राहिली. यावेळी गिलच्या बॅटमधून 2 शतकेही निघाली. त्याने यादरम्यान 14 षटकार आणि 38 चौकारांचाही पाऊस पाडला. 3 वनडे सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत कोणत्याही फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गिलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बाबरने 2016मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 3 वनडे सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत 360 धावा केल्या होत्या. यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानी बांगलादेशच्या इमरूल केयस हा आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 2018मध्ये 349 धावा केल्या होत्या. (cricketer shubman gill century in odi cricket records babar azam india vs new zealand 3rd odi)
तीन सामन्यांच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
360 धावा- बाबर आजम, विरुद्ध- वेस्ट इंडिज (2016)
360 धावा- शुबमन गिल विरुद्ध- न्यूझीलंड (2023)*
349 धावा- इमरूल केयस, विरुद्ध- जिम्बाब्वे (2018)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडिया फोडणारच! नव्या वर्षातील ही तुफानी आकडेवारी समोर, तीन प्रतिस्पर्धी नामोहरम
शतक एक विक्रम अनेक! रोहित बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा पाचवा सक्रिय खेळाडू