भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. हा सण 30 ऑगस्ट रोजी देशभरात साजरा केला जातो. भारतीय खेळाडूंनीही वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा केला. अशात रक्षाबंधननिमित्त भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल याची बहीण शहनील गिल हिने आपल्या वेदना मांडल्या. खरं तर, हा खास क्षण साजरा करण्यासाठी शुबमन गिल आपल्या बहिणीजवळ नसून भारतीय संघासोबत आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी श्रीलंकेत आहे.
आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्स संघाने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शुबमन गिल (Shubman Gill) याची बहीण शहनील गिल (Shubman Gill’s Sister Shahneel) ही भाऊ बाहेर असण्याबाबत बोलताना दिसत आहे. ती व्हिडिओत म्हणत आहे, “मी म्हणेल, की जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा तो माझा सर्वात चांगला मित्र होता. आम्ही प्रत्येक वेळी एकत्र फिरायचो. त्यानंतर त्याने सामन्यांसाठी बाहेर जाणे सुरू केले आणि घरापासून दूर राहू लागला. हे थोडे कठीण होते. कारण, माझे इतर कुणी मित्र नाहीयेत.”
https://www.instagram.com/reel/CwkGsZ4Nnda/?utm_source=ig_embed&ig_rid=c39e06ea-c649-4695-90e7-57a7e5872c27
पुढे बोलताना ती म्हणाली, “आमचे नेहमीच जवळचे नाते राहिले आहे. कारण, आमच्या वयातील अंतर 2.5 वर्षांचे आहे. जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा मी इतकी फ्रेंडली नव्हते, जितकी आज आहे. मी लाजाळू मुलगी होते आणि तो खोडकर होता.”
पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळू शकतो गिल
खरं तर, भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धेतील आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 2 सप्टेंबर रोजी खेळणार आहे. या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शुबमन गिल याला सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळू शकते. कारण, स्पर्धा वनडे प्रकारात खेळली जाणार आहे. तसेच, गिल सुरुवातीपासूनच वनडेत चांगली कामगिरी करत आला आहे. अशात त्याला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या महामुकाबल्यासाठी संधी मिळू शकते.
गिलची कारकीर्द
लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की, शुबमन गिल मागील काही काळापासून भारतासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारात सलामीला फलंदाजी करत आहे. त्याने 2023मध्येच टी20 पदार्पण केले होते. त्याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 18 कसोटी, 27 वनडे आणि 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यानेन कसोटीत 966, वनडेत 1437 आणि टी20त 304 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 7 शतके आहेत. (cricketer shubman gills sister shahneel told about difficulties she face on festival like raksha bandhan know here)
हेही वाचाच-
भारताचा माजी खेळाडू बाबरच्या शतकावर फिदा; म्हणाला, ‘त्याची फलंदाजी डोळ्यांना सुखावणारी…’
राहुलच्या दुखापतीविषयी स्पष्टच बोलला मोहम्मद कैफ; म्हणाला, ‘ही भारतीय संघासाठी चांगली…’