---Advertisement---

बाद की नाबाद? स्मिथने घेतलेल्या जो रूटच्या कॅचमुळे क्रिकेट जगतात खळबळ

Steve-Smith
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023 स्पर्धेतील दुसरा कसोटी सामना 28 जूनपासून सुरू झाला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या जो रूट याचा झेल स्टीव्ह स्मिथ याने टिपला. या झेलामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. इंग्लंडच्या डावातील 46व्या षटकात मिचेल स्टार्क याच्या चेंडूवर स्मिथने रूटचा झेल पकडला. स्मिथ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने धावत आला आणि रूटचा शानदार झेल पकडला.

स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने डाईव्ह मारून अफलातून झेल पकडला. ज्यावेळी स्मिथने झेल पकडला, तेव्हा चेंडू निसटला. मात्र, त्याने लगेच तो चेंडू पकडत झेल पूर्ण केला. मैदानातील पंचांनी या निर्णयावर तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसऱ्या पंचांनी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे दिग्गज फलंदाज जो रूट (Joe Root) फक्त 10 धावा करून तंबूत परतला.

या झेलाविषयी जगभरात जोरदार चर्चा रंगली आहे. स्मिथच्या झेलाची तुलना डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील कॅमरून ग्रीन याच्या झेलाशी केली जात आहे. नेटकरी ऑस्ट्रेलिया संघावर चीटिंग केल्याचा आरोपही लावत आहेत.

खरं तर, स्टीव्ह स्मिथ याने या झेलापूर्वी लॉर्ड्स कसोटीत धमाकेदार फलंदाजी केली होती. तसेच, अनेक विक्रमही आपल्या नावावर केले होते. स्मिथ वेगवान 32 कसोटी शतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज बनला. स्मिथच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 61 षटकात 4 विकेट्स गमावत 278 धावा केल्या आहेत. यजमान संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपासून 138 धावा मागे आहे.

एजबॅस्टनमध्ये पार पडलेल्या ऍशेस मालिका 2023च्या (Ashes Series 2023) पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 2 विकेट्सने पराभूत केले होते. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली होती. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघ लॉर्ड्स येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-0ने आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तसेच, इंग्लंड मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. (cricketer steve smith catch to dismiss joe root in ashes series sparks controversy)

महत्वाच्या बातम्या-
WI Team Announced : ‘या’ 18 धुरंधरांना घेऊन कसोटी मालिकेत भारताविरुद्ध भिडणार वेस्ट इंडिज
भारतीय संघात शिखर धवनचे 9 महिन्यांनी पुनरागमन! मिळणार थेट कर्णधारपदाची जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---