बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात आली. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत भारताच्या किमान पाच खेळाडूंनी 50 धावांचा टप्पा पार केला. मात्र, भारताच्या एका खेळाडूच्या पदरी निराशाच पडली. तो खेळाडू इतर कुणी नसून सूर्यकुमार यादव आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमारला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
सूर्यकुमार यादवचा लाजीरवाणा विक्रम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात पाहुण्या संघाने 270 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून 36वे षटक ऍश्टन एगर (Ashton Agar) टाकत होता. ऍश्टनचा दुसरा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार त्रिफळाचीत बाद झाला. त्यामुळे त्याला शून्यावर तंबूत परतावे लागले.
The game has turned 😲
Ashton Agar snares Virat Kohli and Suryakumar Yadav off consecutive balls!#INDvAUS | 📝: https://t.co/ugxHxHyT1z pic.twitter.com/Ea4p9H9lc3
— ICC (@ICC) March 22, 2023
शून्यावर बाद झाल्यामुळे त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. सूर्यकुमार यादव हा वनडे मालिकेतील सलग तीन सामन्यात पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी खेळल्या गेलेल्या मुंबई आणि विशाखापट्टणम येथील वनडे सामन्यातही सूर्यकुमार प्रत्येकी 1 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला होता.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सूर्याची कामगिरी
सूर्यकुमार यादव याला कसोटीत पदार्पण करण्याची संधी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्याला संधी मिळाली होती. मात्र, त्याला संधीचं सोनं करता आलं नाही. सहाव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या सूर्यकुमारने 20 चेंडूंचा सामना करताना 8 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचाही समावेश होता.
सूर्यकुमारची वनडे कारकीर्द
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शून्यावर बाद होणाऱ्या सूर्यकुमार यादवने भारताकडून 23 वनडे सामने खेळले आहेत. यातील 21 डावात त्याने 24.06च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान 2 अर्धशतकेही केली आहेत. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही 64 इतकी आहे. (cricketer Suryakumar Yadav First player to get dismissed for golden ducks in every match of an ODI series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुझा स्टँडर्ड आभाळाएवढा…’, सिराजने कॅच सोडताच संतापला जडेजा, पण गावसकरांच्या प्रतिक्रियेने जिंकले मन
‘हिटमॅन’चा भीमपराक्रम! बनला आशियामध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा 8वा भारतीय, जाणून घ्याच